अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या लष्करी विमानाने माघारी पाठवले जात आहेत. यातील बरेसचे नागरिक डंकीमार्गाने अमेरिकेत पोहोचले आहेत. अनेकांना परदेशी पाठवणाऱ्या एजंटने फसवून, त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून अमेरिकेत धाडलेलं आहे. मात्र, तिथे जाईपर्यंत या नागरिकांन अतोनात छळ सहन करावा लागला आहे. भारतात परतल्यानंतर त्यांनी पोलिसांनी सर्व हकीकत सांगितली आहे.शनिवारी भारतात परतलेल्या गोव्यातील दोन तरुणांनी त्यांच्यावर बेतलेल्या आपबितीची कहाणी गोवा पोलिसांना विषद केली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी रात्री अमृतसरमध्ये उतरलेल्या ११९ निर्वासित भारतीयांमध्ये हे दोन तरुण होते. ते रविवारी दुपारी गोव्यातील दाबोलिम विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी पोलिस आणि विमानतळ अधिकाऱ्यांकडे त्यांचे जबाब नोंदवले. दक्षिण गोव्यात राहणाऱ्या या तरुणांनी सांगितलं की सल्लागाराने सांगितले होते की ते आश्रय घेऊन कायदेशीररित्या अमेरिकेत प्रवेश करू शकतात. त्यांचे लोक मेक्सिकोहून मालवाहू जहाजाने अमेरिकेत त्यांना घेऊन जातली. मात्र, प्रत्यक्षात त्यांना अनन्वित छळाचा सामना करावा लागला. सध्या सुरू असलेल्या चौकशीत “गोपनीयतेच्या कारणास्तव” या दोघांची नावे सार्वजनिक करण्यात येणार नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

१५ लाखांचं डिल अन् हॉटेलमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन

२५ वर्षीय पीडितांपैकी एकाने निवेदनात म्हटले आहे की त्याने २०२० मध्ये कंटिन्यूज डिस्चार्ज कोर्स (सीडीसी) पूर्ण केला होता आणि परदेशात जहाजावर काम करण्याची त्याची इच्छा होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये काम करत असताना तो वास्कोमध्ये “कन्सल्टन्सी” चालवणाऱ्या एका व्यक्तीला भेटला आणि त्याने लोकांना कायदेशीररित्या कामासाठी अमेरिकेत पाठवल्याचा दावा केला. कन्सल्टंटने १५ लाख रुपये मागितले आणि तीन महिन्यांत त्याला अमेरिकेत पाठवण्याची आणि तेथील हॉटेलमध्ये नोकरी देण्याची ऑफर दिली. २५ वर्षीय तरुणाने त्याला १० लाख रुपये दिले आणि त्याचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे दिली. करारानुसार उर्वरित रक्कम अमेरिकेत पोहोचल्यानंतर द्यायची होती.

J1 व्हिसासाठी लाखो रुपये भरले

गोव्यातील दुसऱ्या २३ वर्षीय निर्वासिताने J1 व्हिसासाठी अर्ज केला होता. सामान्यत: काम आणि अभ्यास-आधारित एक्सचेंज अभ्यागत कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यताप्राप्त लोकांसाठी हा व्हिसा दिला जातो. एजंटला १.५ लाख रुपये दिले होती. परंतु प्रक्रिया अडकली. दरम्यान, मे २०२४ मध्ये तो त्याच कन्सल्टंट भेटला आणि त्याला अमेरिकेला पाठवण्यासाठी ८ लाख रुपये मागितले. त्याने अर्धे पैसे दिले अन् अर्धे पैसे तिथे पोहोचल्यावर देण्याचं कबूल करण्यात आलं. कन्सल्टंटने त्याला सांगितले होते की जर तो तेथील अधिकाऱ्यांना सांगेल की भारतात त्याचे शत्रू आहेत जे त्याला मारू इच्छितात तर तो आश्रय घेऊन अमेरिकेत प्रवेश करू शकतो.

शिडीच्या सहाय्याने भिंत चढायला लावली

२० जानेवारी रोजी हे दोघे गोव्याहून मुंबईला गेले आणि त्यानंतर इस्तंबूलला विमानाने गेले. ते दुसऱ्या विमानाने गेले आणि २२ जानेवारी रोजी मेक्सिकोला पोहोचले, जिथे ते एका हॉटेलमध्ये एक दिवस राहिले. दुसऱ्या दिवशी, त्यांना तिजुआना शहरात नेण्यात आले, जिथे कन्सल्टंटचा संपर्क असलेला एक ‘चिनो’ आणि त्याचे सहकारी त्यांना शिडीच्या मदतीने भिंतीवर चढून सीमा ओलांडण्यास घेऊन गेले.

पैसे, फोन हिसकावून घेतले, सीमेवरून पळून जायला सांगितलं

आपल्या निवेदनात, २५ वर्षीय तरुणाने म्हटले आहे की ते भिंत चढू शकले नाहीत आणि त्यानंतर त्यांचा छळ करण्यात आला. त्यानंतर सीमेवर त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले, त्यांचे फोन, घड्याळे आणि पैसे हिसकावून घेण्यात आले. दोन अफगाण नागरिकांसह, गोव्यातील दोघांना “त्या लोकांनी” सॅन दिएगो येथे सीमेवरून अमेरिकेकडे पळून जाण्यास सांगितले. ट्रक जाण्यासाठी उघडलेल्या सीमेवरील गेटमधून हे सर्वजण पळाले. त्यानंतर, त्यांना अमेरिकन सीमा गस्त पथकाने पकडले. त्यांना हद्दपार करण्यापूर्वी २० दिवस एका डिटेंशन सेंटरमध्येही ठेवण्यात आले.

एनआरआय व्यवहार आयुक्त नरेंद्र सवाईकर म्हणाले, “ज्या गोव्यातील लोकांना उपजीविकेसाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना मी आवाहन करेन की त्यांनी सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे आणि सर्व कागदपत्रे जवळ ठेवावीत. ज्या एजन्सी आणि एजंट्सद्वारे ते परदेशात जाण्याची योजना आखत आहेत त्यांची ओळखपत्रे देखील त्यांनी पडताळून पाहावीत.”