इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आरोग्याशी संबंधित हिंसाचाराविरोधात प्रभावी आणि कडक कारवाईस मान्यता देण्याची विनंती केली आहे. तसेच भारतात आरोग्य हिंसाचाराविरूद्ध सर्वसमावेशक, न्याय्य आणि प्रभावी कायद्याची आवश्यकता असल्याचे आयएमएने पत्रात म्हटले आहे. सोमवारी आसामच्या होजल जिल्ह्यात एका डॉक्टरांवर लोकांच्या एका टोळीने हल्ला केला, ज्यामध्ये एका करोना पेशंटचा मृत्यू झाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात आयएमएने करोना आजाराच्या प्रभावी व्यवस्थापनाबद्दल अभिनंदन करताना म्हटले आहे की, इंडियन मेडिकल असोसिएशन करोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढ्यात देशाच्या पाठीशी उभी आहे. मात्र, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांविरूद्ध विनाकारण हिंसक घटना गेल्या काही वर्षापासून वाढल्या आहेत. हे वैद्यकीय जगासाठी धोकादायक बनले आहे.

आणखी वाचा- करोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू – IMA

आयएमएने म्हटले आहे की, संपूर्ण वैद्यकीय समाज देशासोबत उभा आहे. आम्ही करोना केवळ अथक परिश्रमचं नाही तर आरोग्याशी संबंधित हिंसाचाराचा गंभीर घटनांचा देखील सामना करत आहोत. सोमवारी आसाममध्ये डॉ. सेज कुमार यांच्यावर हल्ला झाला असल्याची माहिती आहे. ते होजल जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर येथे कार्यरत आहेत. हा अत्यंत अमानुष हल्ला होता. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना हिंसाचाराच्या तणावात काम करणे कठीण जात आहे. देशभर ही एक धोकादायक बाब बनली आहे.

आणखी वाचा- भारतात दैनंदिन रुग्णसंख्या घटली; २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ रुग्ण; मृतांची संख्या मात्र चिंताजनक

आरोग्यास हिंसाचाराविरूद्ध भारताला सर्वसमावेशक, न्याय्य आणि प्रभावी कायद्याची आवश्यकता आहे. आरोग्य सेवा हिंसाचाराविरोधात प्रभावी आणि कडक कारवाईस मान्यता द्यावी, अशी विनंती आयएमएने केंद्रीय गृहमंत्र्यांना केली आहे.

Story img Loader