वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुला हिच्या अपघाती मृत्यूप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही अमेरिका सरकारने दिली आहे. पोलिसांच्या अतिवेगवान वाहनाने धडक दिल्याने २३ वर्षीय जान्हवीचा मृत्यू झाला होता. जान्हवीचा अपघाती मृत्यू आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता हे दोन्ही मुद्दे भारतीय राजदूत तरणजितसिंग संधू यांनी उच्चस्तरिय पातळीवर उपस्थित करून तातडीने कारवाईची मागणी केल्यानंतर अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा अपघात गेल्या २३ जानेवारीला घडला होता. पोलिसांचे गस्ती वाहन केवीन डेव्ह हा पोलीस अधिकारी ताशी ११९ किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवत होता, असे वृत्त टाइम्सने सोमवारी प्रसिद्ध केले होते. जान्हवी रस्ता ओलांडत असताना या वाहनाने तिला धडक दिली गेली. या अपघाताचा त्वरित तपास करण्याचे आणि त्यास जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन बायडेन प्रशासनाने भारत सरकारला दिले आहे. 

पोलिसांची असंवेदनशीलता

सिएटल पोलीस विभागाने प्रसारित केलेल्या चित्रफितीत, डॅनियल ऑडरर हा अधिकारी या प्राणघातक अपघाताबद्दल हसत असल्याचे दिसते. त्याने  या प्रकरणाच्या तपासाबद्दलही असंवेदनशीलता व्यक्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immediate inquiry into death of indian student janhvi kandula testimony of america ysh