एपी, न्यूयॉर्क
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करधोरणासंदर्भात केलेल्या घुमजावमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर प्रभाव पडला व अनेक जणांनी ट्रम्प यांच्या ‘क्लृप्ती’मुळेच व्यवहारामुळे नफा कमावल्याचे समोर आले आहे.
ट्रम्प यांनी बुधवारी सकाळी दिलेल्या आर्थिक सल्ल्यानंतर शेअर बाजारात नफा आणि तोटा, असे सत्र सुरू झाले होते. बुधवारी सकाळी ९.३७ वा. च्या सुमारास ट्रम्प यांनी समाज माध्यमावर ‘खरेदी करण्याची ही उत्तम वेळ’ असल्याचे नमूद केल्यानंतर गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रमाणात पैसा कमावल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिवसभर शेअर बाजारात गोंधळ असताना ट्रम्प यांनी कर आकारणीवर घूमजाव करीत ९० दिवस स्थगितीची घोषणा केली. या घोषणेपाठोपाठ अनेक कंपन्यांचे शेअर्स वधारले तर गेल्या चार दिवसांत गमावलेल्या मुल्याच्या तुलनेत ४ ट्रिलियन डॉलर्स परत मिळविल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.
व्हाईट हाऊसचे माजी वकील रिचर्ड पेंटर यांनी बाजारावर नियंत्रण ठेवणे ट्रम्प यांना आवडते परंतु त्यांनी सावधगिरी बाळगावी असा इशाराही दिला. अमेरिकेतील कायद्यानुसार शेअर बाजारातील अंतर्गत माहिती उघड करणे गुन्हा असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. ज्या लोकांनी ट्रम्प यांचे ट्वीट पाहून खरेदी केली त्यांनी खूप पैसा कमावला असा दावाही त्यांनी केला. करधोरणास स्थगिती देण्याचा ट्रम्प यांचा निर्णय पूर्वनियोजित होता अशी शंकादेखील त्यांनी व्यक्त केली. तथापि व्हाईट हाऊसने मात्र हा प्रकार ट्रम्प यांच्या कामाचा भाग असल्याचे सांगितले.
करधोरणास स्थगिती देण्याचा निर्णय पूर्वनियोजित
● ट्रम्प यांच्या सल्ल्यानंतर लोकांना मात्र बाजारात खरेदी करण्यापासून रोखता आले नाही.
● ट्रम्प मीडिया २२.६७ टक्क्यांवर बंद झाला, जो व्यापक बाजारपेठेपेक्षा दुप्पट असून गेल्या वर्षी चारशे दशलक्ष डॉलर गमावलेल्या कंपनीची उत्कृष्ट कामगिरी आणि शुल्क लादण्यात आल्याने किंवा स्थगित केल्यानंतर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही.
● ट्रम्प यांचा कंपनीतील ५३ टक्के मालकी हिस्सा, आता त्यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प जूनियर यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टमध्ये आहे.बुधवारी त्यात ४१५ दशलक्ष डॉलरने वाढ झाली.
अमेरिकेला पर्याय म्हणून चीनकडून इतर देशांची चाचपणी
अमेरिकेने केलेल्या करदरवाढीच्या पार्श्वभूमीवर, चीन इतर देशांशी संपर्क साधत आहे आणि काही घडल्यास अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी संयुक्त आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी गुरुवारी सांगितले की, एखादे चांगले कारण असल्यास, बरेच लोक त्याचे समर्थन करतात. अमेरिका लोकांचा पाठिंबा मिळवू शकत नाही आणि शेवटी अपयशी ठरेल.
चीन सल्लामसलत आणि संवादाद्वारे मतभेद सोडवण्यास तयार आहे, परंतु जर अमेरिका आपल्या भूमिकेवर कायम राहिली तर चीन शेवटपर्यंत लढेल, असेदेखील ते म्हणाले.
काश पटेल यांच्या जागी ड्रस्किोल एटीएफ प्रमुख
एफबीआयचे संचालक काश पटेल यांना काही आठवड्यांपूर्वी अल्कोहोल, तंबाखू, बंदुक आणि स्फोटके (एटीएफ) ब्युरोचे कार्यकारी प्रमुख पदावरून हटविण्यात आले आणि त्यांच्या जागी लष्कर सचिवांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. हा दावा या प्रकरणाशी परिचित असलेल्या तीन लोकांनी केला आहे. पटेल यांच्या जागी लष्कराचे सचिव डॅनियल ड्रस्किॉल यांना हे नेतृत्व का देण्यात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पटेल यांना फेब्रुवारीच्या उत्तरार्धात काढून टाकण्यात आले होते, परंतु ते कधीही जाहीरपणे जाहीर करण्यात आले नाही, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी सांगितले.