* स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी सार्वमत, स्वातंत्र्यविरोधकांची सरशी (१८.९.२०१४)
* इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादाचे जगावर वाढते संकट, पाश्चिमात्य राष्ट्रे-भारत यांच्यासह इतर इसिस समर्थक, नृशंस हत्याकांडे, अनेकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवणे आणि इराक-सीरिया पट्टय़ात अखंड युद्ध यामुळे दहशतीचे सावट
* हाँगकाँगमध्ये लोकशाही असावी या मागणीसाठी युवकांनी सुरु केलेल्या आंदोलनाने क्रांतीचे रूप धारण केले, जगभरात चीनचे इशारे, पोलिसांची आंदोलकांविरोधातील कारवाई यामुळे अंब्रेला क्रांती असे नामकरण
* रशियाकडून युक्रेनवर चढाई, तसेच क्रायमिया रशियात विलीन करण्याच्या करारावर २१.३.२०१४ रोजी स्वाक्षरी
* थालंडमध्ये राजकीय अनागोंदी, पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्या अन्याय्य आणि मनमानीखोर राजवटीविरोधात जनता रस्त्यावर, सरकारी कार्यालये जनतेने ताब्यात घेतली. २.३.२०१४ रोजी देशभरात आणिबाणी जाहीर
* स्वीडन येथील गोथेनबर्ग विद्यापीठात प्रत्यारोपित गर्भ बसविलेल्या महिलेला गर्भधारणा होऊन तिने  सुदृढ बाळाला जन्म दिला.
* मलेशिया एअरलाईन्सचे एमएच ३७० हे विमान बेपत्ता झाले. २४ मार्च रोजी दुर्घटनाग्रस्त होऊन विमान महासागरात बुडाल्याची मलेशियाच्या पंतप्रधानांची घोषणा

Story img Loader