इस्लामाबाद : इम्रान खान यांच्या मोर्चात ( लाँग मार्च) सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही हॉटेलने निवासाच्या खोल्या देऊ नयेत, असा आदेश इस्लामाबादच्या पोलिसांनी काढला आहे. तसेच या मोर्चाचे किंवा नेत्यांच्या भाषणांचे प्रक्षेपण न करण्याचे आदेशही दूरचित्रवाणी माध्यमांना देण्यात आले आहेत.

खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला आहे. पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह राजधानीकडे निघाले आहेत. ४ नोव्हेंबरला हा मोर्चा इस्लामाबादला पोहोचणार आहे. तत्पूर्वी खान यांच्या पक्षाची कोंडी करण्यासाठी पोलिसांनी हा अजब आदेश दिल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अ‍ॅथोरिटी’ (पीईएमआरए) या नियामक संस्थेने मोर्चाचे थेट वार्ताकन न करण्याबाबत आदेश जारी केले आहेत.

Story img Loader