पाकिस्तानात वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, रविवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव ऐनवेळी संसदेच्या उपसभापतींनी घटनाबाह्य ठरवून फेटाळला. त्यानंतर इम्रान यांच्या सल्ल्यानुसार अध्यक्षांनी पाकिस्तानी संसद बरखास्त केली. त्यामुळे तेथे आता ९० दिवसांच्या आत नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. दरम्यान, कार्यकाळ पूर्ण न करू शकलेले इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान नाहीत, तर २० वे पंतप्रधान आहेत.

न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान स्वतंत्र देश झाल्यानंतर, त्याचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी नव्याने स्थापन झालेल्या देशाचे गव्हर्नर-जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यांच्या अधिकाराखाली एक शक्तिशाली केंद्र सरकार राखले. १९४८ मध्ये जिनांचं निधन झाल्यानंतर ख्वाजा नाझिमुद्दीन गव्हर्नर-जनरल झाले, पण खरे अधिकार पंतप्रधान लियाकत अली खान यांच्याकडे होते. २९५१ मध्ये रावळपिंडीच्या कंपनी बागेत लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर ख्वाजा नझिमुद्दीन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आणि गुलाम मोहम्मद यांना गव्हर्नर जनरल बनवण्यात आले.

Image of Allu Arjun House
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जामीन, हल्लेखोरांशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप
PM Modi receives Kuwait Highest Honour
PM Modi Receives Kuwait Highest Honour: PM मोदींना…
sunny leone
Sunny Leone News : सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क सनी लिओनीचे नाव; महिन्याला मिळत होते हजार रुपये
Allu Arjun House Attack
Allu Arjun House Attack : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड; आठ जण ताब्यात
Important decision taken during PM talks between India and Kuwait
भारत, कुवेत आता सामरिक भागीदार; पंतप्रधानांच्या चर्चेदरम्यान महत्त्वाचा निर्णय
Bihar assembly elections will be held under the leadership of Nitish Kumar Modi Information from Deputy Chief Minister Samrat Chaudhary
बिहार विधानसभा निवडणूक नितीशकुमार-मोदींच्या नेतृत्वातच; उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची माहिती
PS Narasimha statement on the constitutional institutions of the country
घटनात्मक संस्थांवर राजकीय प्रभाव नको!
Image of P P Chaudhary
One Nation One Election : वकील ते तीन वेळा खासदार… कोण आहेत एक देश, एक निवडणुकीवरील संसदीय समीतीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी?
Sandeep Dikshit on Delhi Elections 2025 Arvind Kejriwal
“दिल्लीच्या निवडणुकीत आप जिंकली तरी केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत”, काँग्रेसचा दावा; कारण सांगत म्हणाले…

इम्रान खान यांचा राजकीय प्रवास

१९५३ मध्ये मोहम्मद यांनी नाझिमुद्दीनचे सरकार बरखास्त केले. नंतर त्यांना १९५४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लगेचच संसदेत बहुमत मिळाले होते. गुलाम मोहम्मद १९५५ मध्ये पायउतार झाले आणि पूर्व बंगालचे गव्हर्नर-जनरल आणि केंद्रीय मंत्री मेजर जनरल इस्कंदर मिर्झा यांनी गव्हर्नर-जनरल म्हणून पदभार स्वीकारला. मेजर जनरल मिर्झा यांच्या कार्यकाळात पूर्व बंगालचे नाव बदलून पूर्व पाकिस्तान करण्यात आले.

राजकीय संघर्षांपासून अलिप्त असल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा 

पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर ९ वर्षांनी १९५६ मध्ये संविधान स्वीकारले. या घटनेत, देशाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागांना समान प्रतिनिधित्व देण्यात आले होते आणि फेडरल सरकारला व्यापक अधिकार होते. मिर्झा अध्यक्ष झाले आणि सुहरावर्दी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. मात्र, त्यांनी सुहरावर्दी यांना पदावरून हटवले आणि अवामी लीगच्या पाठिंब्याने फिरोज खान नून पंतप्रधान झाले. १९५८ मध्ये पाकिस्तानी राज्यघटना रद्द केल्यानंतर आणि मिर्झा यांना हद्दपार केल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रथमच लष्करी राजवट आली. ही लष्करी राजवट १९७१ पर्यंत जनरल अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली होती. जनरल खान यांची मुख्य मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९७१ च्या युद्धानंतर, झुल्फिकार अली भुट्टो यांनी २० डिसेंबर रोजी पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

Imran Khan No Trust : पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर पाकिस्तानची संसद बरखास्त; पुन्हा निवडणूक होणार!

नंतर १९७३ मध्ये भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यांनी पाकिस्तानला संसदीय लोकशाहीच्या मार्गावर आणले. ५ जुलै १९७७ रोजी जनरल झिया-उल-हक यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने लष्करी उठाव केला. यानंतर जनरल झिया यांनी १९७९ मध्ये भुट्टो यांना फाशी दिली. पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून जनरल झिया-उल-हक यांची राजवट १९८८ पर्यंत टिकली. नंतर एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. १९८८ मध्ये, बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यांचे सरकार १९९० पर्यंत टिकले. त्यानंतर नवाझ शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आणि त्यांचा कार्यकाळ १९९३ पर्यंत राहिला.

१९९७ मध्ये शरीफ पुन्हा पंतप्रधान झाले. परंतु १९९९ मध्ये लष्करी बंड करून जनरल परवेझ मुशर्रफ यांनी त्यांचे सरकार पाडले. त्यांच्या राजवटीत मुशर्रफ यांनी सार्वमत जिंकले आणि २००८ पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. यानंतर सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी पंतप्रधान म्हणून काही काळ पाकिस्तानमध्ये आघाडी सरकारचे नेतृत्व केले. २०१२ मध्ये राजा परवेझ अश्रफ यांना काही काळासाठी पंतप्रधान करण्यात आले.

नवाझ शरीफ २०१३ मध्ये तिसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. शरीफ यांची हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान खान यांनी २०१८ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, आता त्यांच्यावरही अविश्वास प्रस्ताव आणला गेला. अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर तीन महिन्यात निवडणुका घ्याव्या लागतील, तोपर्यंत इम्रान खान पंतप्रधान राहतील. परंतु निवडणुकीत बहुमत मिळालं नाही, तर इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागेल.

Story img Loader