पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आज एका सभेदरम्यान गोळीबार झाला. या घटनेमध्ये इम्रान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खान अध्यक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षानं निवडणुका मागे घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद असा मोर्चा काढला आहे. या मोर्चादरम्यानच इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाल्यामुळे पाकिस्तानमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. हा हल्ला कोणत्या हेतूने करण्यात आला? यासंदर्भात पाकिस्तानमधील तपास यंत्रणा तपास करत असताना अटक करण्यात आलेल्या एका हल्लेखोराचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडण्यामागचं खरं कारण हल्लेखोर सांगत असल्याचं दिसत आहे.

नेमकं घडलं काय?

आज दुपारच्या सुमारास पाकिस्तानच्या वझिराबादमधील झफऱ अली खान चौकात इम्रान खान यांच्या पक्षाचा ‘हकीकी आझादी मोर्चा’ पोहोचला तेव्हा ही घटना घडली. लाहोर ते इस्लामाबाद असा हा मोर्चा असून ४ नोव्हेंबरला तो इस्लामाबादला पोहोचलणार आहे. मोर्चा मुख्य चौकात आल्यानंतर अचानक गोळ्या झाडल्याचे आवाज आल्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. लोकांची पळापळ सुरू झाली. या गोंधळात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लागलीच रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे रवाना केलं. इकचे पोलिसांनी तातडीने पावलं उचलत गर्दीतून हल्लेखोराला हेरलं आणि त्याला अटक केली.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

Firing at Imran Khans Rally : गोळीबारात जखमी झाल्यानंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

यानंतर ट्विटरवर काही युजर्सकडून एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. यात काही पोलीस अधिकारी एका व्यक्तीची चौकशी करत असून ही व्यक्ती इम्रान खान यांच्यावर गोळी झाडल्याची माहिती देत असल्याचं दिसत आहे. हाच इम्रान खान यांच्यावरील हल्लेखोर असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये हल्लेखोरानं इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडल्याचं कबूल केलं आहे.

“इम्रान खान लोकांना फसवत होता. मला हे पाहावलं नाही. मग मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला की त्याला जीवे मारू शकेन. फक्त इम्रान खानलाच मारण्याचं मी ठरवलं होतं. इतर कुणालाही नाही. एकीकडे अजान सुरू होती आणि दुसरीकडे हे डेक लावून आरडा-ओरडा करत होते. याचा विचार करून माझ्या डोक्यात हे आलं”, असं ही व्यक्ती बोलताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Firing at Imran Khan’s Rally : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

“त्याच दिवशी मी ठरवलं की मी इम्रान खानला सोडणार नाही”

“ज्या दिवशी इम्रान खान लाहोरवरून निघाला, त्या दिवसापासून मी ठरवलं की मी त्याला सोडणार नाही. त्याला मारण्याचं नियोजन करून मी निघालो. माझ्यामागे कुणीही नाही. मी कुणाच्याही सांगण्यावरून हे केलेलं नाही. माझ्यासोबत कुणीही नाही. मी एकटाच आहे. माझ्या घरून मी माझ्या बाईकवर एकटाच आलोय. माझी बाईक मी माझ्या मामांच्या दुकानावर लावली”, असंही या हल्लेखोरानं पाकिस्तानमधील पोलिसांना संगितलं आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांनी निषेध केला आहे. इम्रान खान यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.