पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि बुशरा बीबी यांचा निकाह कायदेशीर नव्हता. त्यासंदर्भातली माहिती मौलवीने दिली आहे. शरीया कायद्यानुसार हा निकाह झाला नव्हता असं या मौलवीने म्हटलं आहे. द एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खान आणि बुशरा यांचा निकाह लावून देणारे मौलवी मुफ्ती सईद यांनी सांगितलं की या दोघांचा विवाह इद्दतच्या अवधीत झाला होता. त्यामुळे हा विवाह बेकायदेशीर होता.

इद्दत म्हणजे नेमकं काय?

इस्लाममधल्या शरिया कायद्यानुसार मुस्लिम महिलेचा जर तलाक झाला किंवा तिच्या पतीचा मृ्त्यू झाला असेल तर त्यानंतर जो एक विशिष्ट दिवसांचा कालावधी असतो त्याला इद्दत असं म्हटलं जातं. हा कालावधी १० दिवसांचा असतो. एखाद्या मुस्लिम महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर किंवा तिचा तलाक झाल्यानंतर दहा दिवसांची इद्दत असते. जर एखादी महिला गरोदर असताना विधवा झाली तर इद्दतचा कालावधी हा मुलाच्या जन्मापर्यंत चालतो. इस्लाममध्ये इद्दत पाळणं महिलांसाठी अनिवार्य आहे. या कालावधीत तलाक घेतलेली महिला किंवा विधवा दुसऱ्या पुरुषाशी लग्न करू शकत नाही.

Actor Saif injured in knife attack has successfully operated and is out of danger
Saif Ali Khan: दरोडेखोराने १ कोटी रुपये मागितले, सैफ अली खानच्या घरातील मदतनीसची पोलीस जबाबात माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…
ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…

इम्रान खान आणि बुशरा यांच्या निकाहाला कोर्टात आव्हान

इम्रान खान आणि बुशरा यांच्या निकाहाला कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. यासंदर्भातल्या एका अहवालात हे नमूद करण्यात आलं आहे की कोर्टाची सुनावणी सुरू असतानाच इम्रान खान यांनी बुशरा सोबत निकाह केला. या प्रकरणात मौलवी मुफ्ती सईद यांनीही या निकाह बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे मौलवी सईद यांनी?

सईद यांनी असं म्हटलं आहे की, महिलेने दिलेल्या आश्वासनानंतर २०१८ मध्ये मी इम्रान खान यांचा निकाह लावून दिला. लग्नानंतर हे दोघंही इस्लामाबादमध्ये राहू लागलं होतं. बुशरा यांनी या निकाहाच्या वेळी इद्दतचा कालावधी पूर्ण केला नव्हता. असं आता सईद यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान होण्यासाठी इम्रान खान यांनी केला निकाह

सईद यांनी असंही सांगितलं आहे इम्रान खान यांना पंतप्रधान व्हायचं होतं म्हणून हा निकाह करण्यात आला. बुशरासोबत लग्न झाल्यानंतर पंतप्रधान होईन असं इम्रान खान यांना वाटत होतं. या प्रकरणाची सुनावणी कोर्टाने १९ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. २०१८ मध्ये इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. २०२२ मध्ये त्यांना सत्ता सोडावी लागली. अविश्वास मत प्रस्ताव आणला गेला आणि त्यांना हटवलं गेलं.

Story img Loader