पीटीआय, लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या पोलिसांना रिकाम्या हाती परत जावे लागले. इम्रान खान घरी नव्हते, मात्र ते मंगळवारी न्यायालयासमोर हजर राहतील असे त्यांच्या वकिलांनी पोलिसांना सांगितले. आम्ही इम्रान यांच्या खोलीतही शोध घेतला असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, इस्लामाबाद न्यायालयाने इम्रान यांना अटक करण्याचे आदेश दिलेले नसून त्यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे, असा युक्तिवाद पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला. तोशाखाना प्रकरणात न्यायालयाने बिगर-जामीन अटक वॉरंट जारी केल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.  इम्रान खान यांनी तीन वेळा सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणे टाळले आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ashish Shelar On Saif Ali Khan Attack
Ashish Shelar : “अतिशय भितीदायक घटना, आरोपीच्या शोधासाठी…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेबाबत आशिष शेलारांची महत्वाची माहिती
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…

काय आहे तोशाखाना प्रकरण ?

इम्रान खान यांनी पंतप्रधान पदावर असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती उघड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानात सरकारी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी, मंत्री इत्यादींना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू जमा कराव्या लागतात. त्या विभागाला तोशाखाना असे म्हणतात. इम्रान खान यांनी २०१८ साली सत्तेवर आल्यावर यासंबंधीचा निर्णय बदलला आणि तोशाखानात जमा केलेल्या काही भेटवस्तू अल्प किंमत मोजून परत घेतल्या आणि त्या विकल्या, असा आरोप आहे.

Story img Loader