पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि तेथील राजकीय व्यक्तिमत्त्व इम्रान खान मंगळवारी संध्याकाळी व्यासपीठ कोसळल्यामुळे जखमी झाला. इम्रान खानच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचारासाठी इम्रान खान आपल्या सुरक्षारक्षकांसमवेत सुमारे २० फूट उंचीच्या व्यासपीठावर होते. सुरक्षारश्रक आणि इतर व्यक्तींच्या गर्दीमुळे अचानक व्यासपीठ कोसळले. त्यामुळे इम्रान खान आणि त्याचे सुरक्षारक्षक खाली कोसळले. खाली पडल्यानंतर इम्रानच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे वृत्तवाहिन्यांवर दाखवत असलेल्या चित्रणावरून दिसत होते. इम्रानच्या सुरक्षारक्षकांनी तातडीने त्याला शौकत खानुम रुग्णालयात दाखल केले.
इम्रानच्या डोक्यावर पुढील आणि मागील बाजून दुखापत झाली असल्याचे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दूल कादीर याने सांगितले. कादीर ही घटना घडली, त्यावेळी तिथे उपस्थित होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा