पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीच्या आधीच इम्रान खान यांना तुरुंगात जावं लागलं आहे. त्यांना निवडणूक लढवता येणार नाही अशीच चिन्हं आहेत. अशात इम्रान खान यांचा पक्ष तहरीक ए इन्साफसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या गृहविभागाने सरकारला एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात ९ मे २०२३ ला लाहोरमध्ये जो हिंसाचार उसळला त्याचे मास्टरमाइंड इम्रान खान आहेत असं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या

कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्टँडिंग कमिटीने १७ पानांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये ९ मेच्या दिवशी जो हिंसाचार उसळला त्यासाठी इम्रान खान जबाबदार आहेत असा उल्लेख आहे. निवडणूक होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी हा अहवाल समोर आल्याने इम्रान खान आणि त्यांचा तहरीक ए इन्साफ हा पक्ष यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Worli accident case, Mihir Shah , High Court ,
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
Rhona Wilson
रोना विल्सन, सुधीर ढवळे यांना जामीन; शहरी नक्षलवाद प्रकरण
supreme Court
Supreme Court : वयाच्या १४ वर्षी केलेल्या गुन्ह्यात व्यक्तीची २९ वर्षांनंतर सुटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

९ मे २०२३ या दिवशी काय घडलं होतं?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे २०२३ या दिवशी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरुन अटक करण्यात आली होती. इम्रान खान यांना करण्यात आलेली अटक बेकायदा आहे असं त्यांचे समर्थक म्हणाले होते आणि त्यांनी तिथे आंदोलन सुरु केलं. या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागलं. ज्यानंतर पीटीआयच्या कार्यकर्त्यांना इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर यांसह देशभरातल्या विविध शहरांमध्ये तोडफोड केली. तसंच छोट्या आणि मोठ्या गाड्या पेटवल्या. शाहबाज सरकारने या प्रकरणाला लष्करासंदर्भातला गुन्हा मानलं. त्यामुळे या प्रकरणात इम्रान खान यांना जबाबदार ठरवण्यात आलं आहे. तसंच लष्करी न्यायालय या प्रकरणी शिक्षा सुनावणार आहे. News 18 ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- विश्लेषण : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले ‘सिफर प्रकरण’ नेमके काय आहे?

इम्रान खान आणि त्यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान यांना हा मोठा झटका मानला जातो आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सिफरचं प्रकरण नेमकं काय आहे?

सिफरचं हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. अत्यंत गुप्त माहिती वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचा इम्रान खान यांच्यावर आरोप आहे. सत्तेपासून बेदखल झाल्यानंतर इमरान खान यांनी थेट अमेरिकेवर आरोप केला होता. मला सत्तेतून बेदखल करण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप इमरान खान यांनी केला होता. वॉशिंग्टन येथील एका एम्बेसीने मला एक गुप्त टेप पाठवली होती, असा दावाही इम्रान खान यांनी केला होता. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त गोष्टी सार्वजनिक केल्या होत्या. त्यालाच सिफर असं म्हटलं जातं.

Story img Loader