लाहोर, इस्लामाबाद : सध्याची नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करून तातडीने सार्वत्रिक निवडणूक घेण्याची मागणी करत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद असा महामोर्चा सुरू केला आहे. त्यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले असून ४ नोव्हेंबरला मोर्चा राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचणार आहे.

खान यांनी आपल्या मोर्चाला ‘हकिकी आझादी मार्च’ (खऱ्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन) असे नाव दिले आहे. पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांच्या आफ्रिकेत झालेल्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या या मोर्चासाठी सरकारकडून परवानगी मिळवली आहे. मात्र इस्लामाबादला पोहोचल्यावर काय करणार, हे खान यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. मोर्चा संपल्यानंतर आंदोलक आपापल्या गावी परतणार की पार्लमेंटसमोर ठिय्या देणार, हे स्पष्ट झालेले नाही. २०१४ साली खान यांच्या पक्षाने तब्बल १२६ दिवस तेथे निदर्शने केली होती.  मोर्चासाठी  कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.

 वाढवली असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी पीटीआयच्या कार्यकर्त्यांना दिला. याला प्रत्युत्तर देत पक्षाचे सरचिटणीस असद उमर म्हणाले की, मोर्चा शांततापूर्ण मार्गानेच निघेल आणि यापुढे लोकांनाच निर्णय घ्यायचा आहे.