पीटीआय, इस्लामाबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी राजकीय पुनरागमन करण्यासाठी घटनाबाह्य साधनांचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याची टीका त्यांच्या राजकीय प्रतिस्पध्र्यानी केली आहे. तीन वेळा पंतप्रधान राहिलेले आणि पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे शरीफ लंडनमधील चार वर्षांच्या वास्तव्यानंतर शनिवारी मायदेशी परतले.

 एका दोषी व्यक्तीचे प्रत्येक ठिकाणी अन्यायाने आणि बेकायदेशीररीत्या स्वागत करण्यात येत आहे, असे पाकिस्तान तहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सरचिटणीस ओमर अयुब खान म्हणाले. ‘एका दोषी व्यक्तीला अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक मिळाली आणि त्याच्या स्वागतासाठी इस्लामाबाद विमानतळावरील सरकारी कक्ष उघडण्यात आला’, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा >>>युद्धग्रस्त पॅलेस्टाईनला  भारताकडून मदत रवाना; ४० टन सामुग्री घेऊन विमान इजिप्तकडे

 शरीफ यांच्या लाहोरमधील सभेसाठी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासह पटवाऱ्यांसारख्या सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती निश्चित करण्याचे निर्देश पंजाब सरकारने सर्व उपायुक्तांना दिले होते, असा दावा पीटीआयचे ज्येष्ठ नेते मूनीस इलाही यांनी केला.

(नवाझ शरीफ)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khan party criticizes sharif misuse of government machinery amy
Show comments