Firing at Imran Khans Rally in Wazirabad : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला असून या गोळीबारात ते जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती पाकिस्तानी पत्रकार इश्तीशाम उल हक्क यांनी दिली आहे.
इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया
”अल्लाहने मला आणखी एक जीवन दिले आहे. मी पुन्हा लढेन”, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली असल्याची माहिती इश्तीशाम उल हक्क यांनी दिली आहे.
हेही वाचा – विजय मल्ल्याचे वकीलही वैतागले, सुप्रीम कोर्टाला म्हणाले “आम्हाला या प्रकरणातून मुक्त करा, तो साधं…”
वजिराबाद शहरात रॅलीवर हल्ला
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला असून पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह इस्लामाबादकडे निघाले होते. दरम्यान, आज हा मोर्चा वजिराबाद शहरात पोहचला असता या रॅलीवर गोळीबार झाला. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली आहे, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत.
हल्लेखोराला अटक
हल्लेखोराने एके-४७ या बंदुकीतून गोळाबार केला आहे. गोळीबाळानंतर एकच गदारोळ उडाला होता. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. हल्ल्यानंतर इम्रान खान यांना बुलेटप्रूफ मोटारीतून तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. पीटीआय पक्षाचे नेते फैसल जावेद हेही हल्ल्यात जखमी असल्याचे वृत्त आहे.