Parliament Budget Session 2025: राजधानी दिल्लीमध्ये सध्या संसदेचे आर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांने करदात्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहे. दरम्यान अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणा फसव्या असल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. अशात काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनीही अर्थसंकल्पावरून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करत, त्यांना सर्व सामान्य महिलांच्या अडचणी माहित नसल्याची टीका केली आहे. याचबरोबर प्रतापगढी यांनी सिंकदर बादशाहची गोष्ट सांगत अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर जिंकणं बादशाहांचं काम, पण …

आज राज्यसभेत बोलताना काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी म्हणाले, “सभापती महोदय मी आपल्यासमोर एक छोटी गोष्ट सांगू इच्छित आहे. महान बादशाह सिकंदरने जेव्हा युनान जिंकले, तेव्हा शहाराच्या रस्त्यांवर तो जल्लोष साजरा करण्यासाठी उतारला होता. तेव्हा पूर्ण शहर जल्लोष करत असल्याचे सिकंदरने पाहिले. पण त्याचवेळी रस्त्याच्या कडेला एक सिकंदर अंगावर चादर घेऊन झोपला होता. हे पाहून सिकंदरला राग आला आणि त्याने घोड्यावरून उतरून झोपलेल्या फकीराला जोरदार लाथ मारली. यानंतर सिकंदर फकिराला म्हणाला, काय रे फकिरा मी युनान जिंकलं आहे, सर्व लोक जल्लोष करत आहेत आणि तू झोपलाय. तेव्हा फकीर सिकंदरला म्हणाला, शहर जिंकणं बादशाहांचे काम आहे, पण लाथ मारणं गाढवाचं काम आहे.”

सामान्य जनतेला लाथ मारणं बंद करा

ते पुढे म्हणाले, “सिकंदर बादशाहने जशी फकिराला ताथ मारली, तशीच सरकार सर्वसामान्य जनतेला लाथ मारत आहे. सभापती महोदय सामान्य जनतेला लाथ मारणे बंद करा. यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक आणि श्रीमंतांसाठी बनवण्यात आलेला अर्थसंकल्प आहे.”

राज्यसभेत गोंधळ

दरम्यान आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा, वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवाल राज्यसभेत सादर झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. राज्यसभेत तत्पूर्वी, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी जेपीसीमध्ये विरोधी सदस्यांच्या आक्षेपांचा समावेश न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर प्रचंड गदारोळानंतर विरोधी पक्षांनी राज्यसभा सभागृहातून सभात्याग केला. यानंतर, सरकारने विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले आणि सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.