कराची या हिंसाचारग्रस्त शहरामध्ये झालेल्या फेरमतदानात क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने लक्षणीय विजय मिळविला.
तेहरिकचे उमेदवार अरीफ अल्वी यांना १७ हजार ४८९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी, जमात-इ-इस्लामीचे उमेदवार नइमतुल्ला खान यांना अवघ्या ४४६ मतांवर समाधान मानावे लागले. गेल्या ११ मे रोजी झालेल्या निवडणुकीत मतदान केंद्रे काबीज करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर ४३ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. पाकिस्तान -तेहरिक-ए-इन्साफच्या उपाध्यक्षा झाहरा शहीद हुसेन यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी हत्या करण्यात आल्यानंतर या भागात कमालीचा तणाव वाढला होता,  तसेच सामान्य लोकही भयग्रस्त झाले होते. बदल घडवून आणण्याच्या दिशेने मोठा कौल दिला आहे, असा दावा अरीफ अल्वी यांनी निकालानंतर केला.

Story img Loader