मुस्लीम मुलींनी हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करावा की नाही? या मुद्द्यावरून सध्या देशातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच ढवळलं गेलं आहे. कर्नाटकमध्ये सरकारी महाविदयालयाने मुस्लीम मुलींना हिजाब किंवा बुरखा घालून महाविद्यालयात प्रवेश नाकारला आहे. यावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एबीपीशी बोलताना यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. संसदेत डोक्यावर पदर घेऊन येणाऱ्या महिला खासदारांना तुम्ही पदर खाली घ्यायला सांगणार आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“लोकांमध्ये एक गैरसमज आहे की…”

“एक गैरसमज लोकांमध्ये आहे की हिजाब हे आमच्या संस्कृतीच्या, धर्माच्या विरुद्ध आहेत. अनेक मुली हिजाब न घालता कॉलेजमध्ये जात आहेत. अनेक मुली हिजाब घालून कॉलेजमध्ये जात आहेत. पण माझं हे म्हणणं आहे की तुम्ही यासंदर्भात कायदा कसा आणणार? विशेषत: भारतासारख्या लोकशाही देशात. राष्ट्रपतींनी गेल्या आठवड्यात संसदेत एक भाषण दिलं होतं. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून म्हटलं होतं की आमच्या सरकारचं एक ध्येय आहे ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि विविधता. आता स्वातंत्र्य आणि समता असती, तर तुम्ही त्या मुलींना कॉलेजच्या बाहेर केलं नसतं”, असं जलील म्हणाले आहेत.

“त्या मुलींनी काही गुन्हा केलेला नाही”

“कॉलेजच्या व्यवस्थापनानं त्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला असता. त्यांना समजावलं असतं. त्या कुणी दहशतवादी नव्हत्या. त्या हिजाब घालून येत आहेत तर त्यांनी काही गुन्हा केलेला नाही”, असं देखील जलील म्हणाले आहेत.

Karnataka Hijab Row Live : हिजाब घालण्यास मनाई करणे हे मुलींच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन – असदुद्दीन ओवेसी

“लोकसभेत आजही भाजपाच्या राजस्थानच्या महिला खासदार डोक्यावर पदर घेऊन येतात. कारण त्यांच्या संस्कृतीचा तो भाग आहे. सर्व महिला तसं नाही करत, कारण तो त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण राजस्थानच्या महिला खासदार पदर डोक्यावर घेतात. मग आता तुम्ही त्यांना सांगणार आहात का की डोक्यावरचा पदर खाली घ्या. त्या मुलींनी आपलं डोकं हिजाबने झाकलं, तर कोणता गुन्हा केला?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.