मॅगीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर ‘स्नॅपडील’ या ऑनलाईन विक्री केंद्रावर अवघ्या पाच मिनिटात मॅगीची ६० हजार स्वागत पॉकिटे विकली गेली. दोन मिनिटात तयार होणाऱ्या या मॅगीला पाच मिनिटात मिळालेला प्रतिसाद अचंभित करणारा ठरला.
मॅगीवरील सर्व आरोप फेटाळून न्यायालयाने ‘क्लीन चीट’ दिल्यानंतर पाच महिन्यानंतर मॅगीने बाजारात पुनरागमन केले. त्यानंतर स्नॅपडीलने या आठवडय़ात ते मॅगीची नवीन पॉकिटे विकतील, असे सांगितले होते. २०१६च्या मॅगीच्या दिनदर्शिकेसोबत मॅगीची स्वागत पॉकिटे देण्यात येतील अशी योजना स्नॅपडीलने जाहीर केली होती. ९ नोव्हेंबरला नोंदणी सुरू करण्यात आली आणि आज स्नॅपडीलवर त्याची व्रिकी करण्यात आली. त्यावेळी अवघ्या पाच मिनिटात मॅगीची ६० हजार स्वागत पॉकिटे विकली गेली. कमी वेळात आवडीचे उत्पादन कसे विकले जाऊ शकते, याचे आम्ही साक्षीदार असून देशभरातील ग्राहकांनी याला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे स्नॅपडीलचे वरिष्ठ उपाध्यक्ष टोनी नवीन म्हणाले. मॅगीच्या स्वागत पॉकिटांची दुसरी नवी योजना १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मॅगीने देशभरातील १०० शहरांमध्ये ३०० वितरकांद्वारे पुनरागमन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा