अंमलीपदार्थविरोधी कायद्याचा धाक दाखवत एका अज्ञात व्यक्तीने २७ वर्षीय तरुणीला ५ लाख रुपयांनी गंडा घातल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही, ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे म्हणत त्यांनी तिला कॅमेरासमोर विवस्र होण्यास भाग पाडल्याचंही पुढे आलं आहे. १३ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये ही घटना घडली. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १३ ऑक्टोबर रोजी पीडित तरुणीला एका अनोळखी क्रमांकाहून फोन आला होता. यावेळी तिच्या नावाने ड्रग्सचे एक पार्सल थायलंडला पाठण्यात आल्याचं तिला सांगण्यात आलं. तसेच याप्रकरणी त्वरीत सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची सुचनाही संबंधित व्यक्तीकडून करण्यात आली. त्यानंतर काही मिनिटांनी तिला पुन्हा एक कॉल आला. यावेळी तिला दिल्ली पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागातून बोलत असल्याचे सांगण्यात आलं. तसेच चौकशीसाठी व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल जॉईन करा, असे सांगण्यात आलं.

Husband Killed His Wife Over Instagram Reels
Crime News : Instagram रिल्स पोस्ट करण्यावरुन वाद झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या, कुठे घडली ही घटना?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
baba siddiqui murder case
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौथ्या आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश!
Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!
venugopal dhoot news in marathi
वेणुगोपाल धूत , इतरांना एक कोटी भरण्याची ‘सेबी’ची नोटीस
Delivery boy killed
दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला
gambler man dies after jumped from second floor of the building over police action fear svk 88 zws
पुणे: जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान मृत्यू
karjat funeral marathi news
वडिलांच्या अंत्यविधीला बोलावले नाही म्हणून डोक्यात दगड घालून तरुणाने केला भावाचा खून

कॅमेऱ्यासमोर विवस्र होण्यास भाग पाडलं

सुरुवातीला तरुणीने नकार दिला. मात्र, तिला डिजिटल अरेस्ट करण्यात आलं असून जॉईन न झाल्यास अटक करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने लगेच व्हिडीओ कॉल जॉईन केला. यावेळी आरोपीने तिला जन्मखून तपासाची असल्याचे म्हणत विवस्र होण्यास सांगितले. तरुणीने त्यालाही नकार दिला. पण पुन्हा तिला अटक करण्याची धमकी देत विवस्र होण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने विवस्र होतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत तो व्हि़डीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. तसेच तिच्याकडून जवळ ५ लाख उकळले.

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने आधी याची माहिती शेजारच्याला दिली. त्यांनी आरोपीच्या नंबर फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आलं. अखेर तरुणीने पोलीस ठाण्यात पोहोचत तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.