अमेरिकेतील वादळाने आतापर्यंत २६ बळी घेतले असून सोमवारी दक्षिण भागात नऊ जण मरण पावले होते. अलाबामा व मिसिसीपी पट्टय़ात अनेक ट्रक उलटले, घरे भुईसपाट झाली, टेलिफोनचे खांब उखडले. गेल्या दोन दिवसांत या भागात वादळी हवामान आहे.
अलाबामा, केंटुकी, मिसिसीपी येथे हजारो लोक विजेविना आहेत. हवामान खात्याने आणखी वादळाचे इशारे दिल्याने अनेक लोकांनी तळघरांचाआश्रय घेतला आहे. अलाबामामध्ये वादळाचा इशारा देण्यात आला आहे. रडारच्या प्रतिमानुसार वादळ आता बर्मिगहॅमकडे चालले आहे.
हवामान उपग्रहांनी दिलेल्या छायाचित्रात दक्षिणेकडे ढग दिसत असून लिटल रॉक, अरकान्सास या शहरात १५ जण मारले गेले असून ओक्लाहोमा व आयोवात रविवारी एक जण ठार झाला आहे.
विन्सटन परगणे, मिसिसिपी येथे एका पाळणाघर मालक महिलेसह सहा जण मारले गेले आहेत. लुईसव्हीले येथे ते पाळणाघर होते. लुईसव्हिले येथे ६६०० लोक राहतात. त्या वेळी पाळणाघरात मुले होती की नाही हे समजू शकले नाही. मिसिसीपीचे गव्हर्नर फिल ब्रायंट यांनी सांगितले, की राज्यात सात जण मरण पावले.
राज्याचे आरोग्य संचालक जिम क्रेग यांनी सांगितले, की मृतांचा नक्की आकडा शवविच्छेदकांच्या माहितीशी आकडे जुळवल्यावर सांगता येईल. तुपेलोच्या दक्षिणेला एका व्हेरोना येथे एका महिलेची मोटार वादळवाऱ्यात वाहून गेली. उत्तर अलाबामा येथे दोन जण मरण पावले, असे लाइमस्टोन परगण्याच्या आपत्कालीन संचालक रिटा व्हाइट यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा