Andhra Pradesh Hidden Camera in Girls Hostel Washroom : आंध्र प्रदेशमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा आढळल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या कॅमेराद्वारे जवळपास ३०० व्हिडीओ रेकॉर्ड करून शेअर करण्याता आल्याचा दावाही या विद्यार्थिनींनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्णा जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींच्या वसतीगृहात काही विद्यार्थिनींना छुपा कॅमेरा आढळून आला आहे. त्यानंतर या विद्यार्थिनींनी आक्रमक पावित्रा घेत, महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये विरोध प्रदर्शन सुरू केलं आहे. गुरुवारी मध्यरात्री शेकडो विद्यार्थिंनीनी महाविद्यालय परिसरात जमत आंदोलन केलं.

हेही वाचा- Female Doctor Attacked : केस ओढले, बेडवर डोकं आपटलं, महिला डॉक्टरवर रुग्णाचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

छुप्या कॅमेऱ्याद्वारे ३०० व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा दावा

यावेळी या विद्यार्थिनींकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुलींच्या वसतीगृहात आढळलेला कॅमेरा अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लावला असून या कॅमेराद्वारे जवळपास ३०० व्हिडीओ रेकॉर्ड करून शेअर करण्यात आल्याचा आरोप या विद्यार्थिंनींनी केला आहे. याप्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणीही या विद्यार्थिनींनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अखेर पोलिसांना या ठिकाणी बोलवण्यात आले.

हेही वाचा – Andhra Pradesh Explosion : आंध्र प्रदेशातील एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट; १५ जणांचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमी

आरोपीला अटक

पोलिसांनी याप्रकरणी या महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याचा मोबाईल आणि लॅपटॉपदेखील जप्त करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे विद्यार्थ्याची ओळख जाहीर करत नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनानेही प्रतिक्रिया देत विद्यार्थिनींच्या आरोपाचे खंडन केलं आहे. वसतीगृहात असा कोणताही कॅमेरा सापडला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In andhra pradesh hidden camera in girls hostel washroom student protests spb