PM Modi in G20 Summit Delhi 2023 : जी २० शिखर परिषदेला आज (९ सप्टेंबर) देशाच्या राजधानीत सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन दिवसीय परिषदेसाठी जोरदार तयारी सुरू होती. जगभरातील अनेक नेते या परिषदेसाठी भारतात आल्याने त्यांच्या योग्य पाहुणचारासाठी भारताने खबरदारी घेतली आहे. दरम्यान, शिखर परिषदेला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कारण, या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरील नामफलकावर भारत असा उल्लेख आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून इंडिया नाव वगळून त्यात भारत असं नाव जाणीवपूर्वक लिहिले जात आहे. जी २० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडंट ऑफ भारत असा उल्लेख झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर, अनेक महत्त्वाची कागदपत्र, सरकारी पुस्तिकेतही इंडियाचं भारत असं नामकरण करण्यात आलं आहे. आताही शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामफलकावर भारत असा उल्लेख आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये ‘भारत’ दाखवणारे फलक स्पष्ट दिसत आहे.

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Who is Nikhil Kamath ?
Who is Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच्या पहिल्या पॉडकास्टमुळे चर्चेत आलेले निखिल कामथ कोण आहेत?
AICC Headquarters at 24, Akbar Road, New Delhi (PTI Photo/
Congress : २४, अकबर रोड; हा काँग्रेसचा पत्ता सुमारे पाच दशकांनी बदलणार, १५ जानेवारीला नव्या मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा
anjali damania valmik karad dhananjay munde
Anjali Damania Social Post: “काल एक गोपनीय पत्र आलं”, अंजली दमानियांचा वाल्मिक कराडबाबत नवा दावा चर्चेत!
Sudhir Mungantiwar and Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून वगळलं का? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”
Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar : “माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला…”; सुधीर मुनगंटीवार यांचा अंगुलीनिर्देश कुणाकडे?

हेही वाचा >> G20 Summit : “अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं…”; दिग्गज राष्ट्रप्रमुखांसमोर मोदींनी दिला ‘तो’ संदर्भ

जी २० परिषदेच्या उद्घाटनच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जी २० चा अध्यक्ष म्हणून भारत सर्व देशांचं स्वागत करतो. २१ व्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ आहे. हा असा काळ आहे जेव्हा अनेक वर्षांच्या अडचणी आता नव्या उपाययोजनांची मागणी करत आहेत. म्हणून आपल्याला मानवकेंद्री दृष्टीने पाऊल उचलत जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील आणि पुढे जावं लागेल.”

मोदी पुढे म्हणाले, “जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार असो, उत्तर आणि दक्षिणमधील विभागणी असो, पूर्व आणि पश्चिममधील दुरावा असो, अन्न, इंधन आणि खते यांचं व्यवस्थापन असो, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा असो, आरोग्य, उर्जा आणि पाणी सुरक्षा असो, वर्तमानासह भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला या आव्हानांवर उपाययोजना करण्याकडे वाटचाल करावी लागणार आहे.”

“कोट्यावधी भारतीय जी२० परिषदेबरोबर जोडले गेले”

“भारताचं जी २० परिषदेचं अध्यक्षपद देशांतर्गत आणि देसाच्या बाहेर समावेशकता आणि सर्वांना सोबत घेण्याचं प्रतिक झालं आहे. देशातील ६० शहरांमध्ये २०० हून अधिक बैठका झाल्या. भारतात जी २० जनतेची परिषद झाली आहे. कोट्यावधी भारतीय या परिषदेबरोबर जोडले गेले आहेत. सर्वांना सोबत घेण्याच्या भावनेनेच भारताने अफ्रीकन संघाला जी २० चं स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मला विश्वास आहे की, या प्रस्तावावर आपल्या सर्वांचं एकमत होईल,” असंही मोदींनी नमूद केलं.

Story img Loader