एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला कारखाली चिरडल्याची घटना उघडकीस आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या वृद्ध व्यक्तीला धडक दिल्यानंतर त्याला आठ किलोमीटरपर्यंत कारच्या बोनेटवर फरपटत नेले. शंकर चौधरी असे वृद्ध व्यक्तीचे नाव असून या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा – Video : बिअर पित एक्स्प्रेसवेवर बुलेटची रायडिंग, Reel व्हायरल होताच पोलिसांनी पठ्ठ्याची नशाच उतरवली

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना

हेही वाचा – “राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झालेल्यांचं शुद्धीकरण करायला हवं”; दीपक केसरकरांचा संजय राऊतांना खोचक टोला; म्हणाले, “बाळासाहेबांचं…”

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्व चंपारण जिल्ह्यातील बांगडा या गावचे रहिवासी असलेले शंकर चौधरी हे शुक्रवारी सायंकाळी कोटावा जवळील राष्ट्रीय महामार्ग २८ वरून रस्ता ओलांडत होते. यावेळी गोपालगंजकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. यावेळी शंकर चौधरी हे बोनेटला पकडून होते. त्यांनी चालकाला गाडी थांबवण्याची विनंती केली. मात्र, चालकाने चौधरी यांना आठ किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. त्यानंतर अचानक ब्रेक दाबल्यानंतर चौधरी हे बोनेटवरून खाली पडले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावरून गाडी नेली. या अपघातात चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने गाडी तिथेच ठेऊन पळ काढला.

हेही वाचा – New York Airplane Crash : मृत्यू येणार हे समजलं, प्रवाशाचा बायकोला हृदय पिळवटून टाकणारा मेसेज; म्हणाला “मी तुझ्यावर…”

हेही वाचा – धीरेंद्र महाराज-अंनिस वादात आता राम कदमांची उडी; म्हणाले, “स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे…”

दरम्यान, ही गाडी पोलिसांनी जप्त केली असून ही गाडी मोतीहारी भागातील एका डॉक्टरची असल्याची माहिती कोटावाचे एसडीपीओ अरुर कुमार गुप्ता यांनी दिली. तसेच चालकाची ओळख तपासण्यासाठी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, या अपघातानानंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांकडून रास्ता रोको करण्यात आला. मात्र, पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरीक शांत झाले.