श्रीनगरच्या हद्दीबाहेर खोनमोह येथे सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. या चकमकीत केंद्रीय राखवी पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला असून त्याला ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या जवानाची प्रकृती आता स्थिर आहे. खोनमोह भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी बालहामा येथील घराला घेराव घातला. चारही बाजूंनी आपण घेरले गेल्याचे लक्षात आल्यानंतर या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला.
प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले. या दोघांच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या दोन्ही दहशतवाद्याकडे शस्त्रसाठा आणि दारुगोळाही सापडला आहे.
#SpotVisuals from Srinagar's Khanmoh area where 2 terrorists were eliminated after encounter with security forces, yesterday, following an attack on BJP leader Anwar Khan. #JammuAndKashmir pic.twitter.com/NHYfKPWmS8
— ANI (@ANI) March 16, 2018