Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. मात्र, पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेणं टाळलं. या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले आहेत. आता या ही पुढे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान या हल्ल्याप्रकरणी ‘तटस्थ चौकशी’ला तयार असल्याचं ते म्हणालेत. वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या अहवालावरून इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

पहलगाम येथे झालेला हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचा दावा भारताने तांत्रिक बुद्धिमत्ता आणि विश्वसनीय माहितीच्या आधारावर केला आहे. या दाव्यानंतर पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानने आता तटस्थ चौकशीला तयारी दर्शवली आहे.

या हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींमधील गुप्तचर सूत्रांमुळे या हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, असंही इंडियन एक्स्प्रेसने वृत्ता म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दोन दिवसांत १३ जागतिक नेत्यांशी संवाद साधून, दिल्लीत ३० हून अधिक राजदूत आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, परराष्ट्र मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीतून ही माहिती मिळाली आहे.

पश्चिमेकडील देशांसाठी दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे, प्रशिक्षण देणे आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा हा इतिहास म्हणजे पाकिस्तानचं सर्वांत वाईट काम आहे, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी काल म्हटलं होतं. त्यानंतरच, पंतप्रधान शरीफ यांचं हे विधान आलं आहे. ते स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मोदींनी मानले जागतिक नेत्यांचे आभार

भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर राजनैतिक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले आहे. या संकटाच्या काळात भारताला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार मानले आहेत. याचबरोबर सर्व परदेशी नागरिकांसाठी भारत भारत सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने त्यांच्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हाझरी जारी करण्याची घाई करण्याची गरज नसल्याचे भारताने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनने त्यांच्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हाझरी जारी केली आहे.