गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी पुलसलगोदी परिसरात बेस कॅम्पवर परतणाऱ्या सी ६० कमांडो पथकावर हल्ला केला. यात तीन जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आधी आयईडीची स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेचच जवानांवर गोळीबार केला. त्याआधी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी अकराच्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला होता. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in