जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू व पूँछ जिल्ह्य़ातील सीमेलगत पाकिस्तानने गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, त्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या बाजूने अचानक आंतरराष्ट्रीय सीमेवरील हिरानगर भागात सकाळी ११.२० वाजता बेछूट गोळीबार करण्यात आला. गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान ए.के.राभा हा जखमी झाला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी लगेच त्याला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याने सीमेवरील छावण्यांवरही प्रत्यक्ष ताबा रेषेवर गोळीबार केला, त्यात स्वयंचलित शस्त्रे व हातबॉम्बचा वापर करण्यात आला. पूँछ जिल्ह्य़ात रात्री १२.०५ वाजता गोळीबार झाला.

Story img Loader