केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदी विराजमान झालेल्या राहुल गांधी यांनी भाषणाच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हा हा एक प्रकारचा अहंकार होता अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

झारखंड राज्यात भाजपाची प्रदेश विस्तारित कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांपुढे भाषण करतांना अमित शाह यांनी झारखंडचे सरकारवर टीका केलीच आणि राहुल गांधी यांना लक्ष्य केले. अमित शाह म्हणाले ” अनेकदा असं दिसून आलं आहे की लोकशाहीत निवडणूका जिंकल्यावर सत्तेत आल्यावर अहंकार येतो.सध्या अशी लोकं झारखंडमध्ये सत्तेत आहेत. पण मी पहिल्यांदा असं पाहिलं आहे की निवडणूक हरलेल्यांना पण अहंकार आलेला आहे. संसदेमध्ये तुम्ही राहूल गांधी यांना बघितलं असेल. दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यावर सुद्धा एवढा अहंकार आला नसेल एवढा त्यांना आला आहे. “

bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Uddhav Thackeray Balapur, Uddhav Thackeray Criticize BJP, Balapur,
‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

हे ही वाचा… Jindal Steel Dinesh Saraogi : ‘विमानात तरूणीला पॉर्न दाखवून जवळ ओढलं’, जिंदल स्टिलच्या ‘त्या’ सीईओवर मोठी कारवाई

अमित शाह यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले आम्ही सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलो. एनडीएला पुर्ण बहुमत मिळालं, तरी काही लोकं पराभव स्वीकारायला तयार नाहीत, तरी कोणता अंहकार अजुनही आहे यांना ? घराणेशाहीचा अहंकार आहे का ? त्यांना देशाच्या सुरक्षेबाबत तडजोज केल्याचा अंहकार आहे का ? असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला आहे. तसंच झारखंड राज्यातील हेमंत सोरेन यांचे सरकार हे सर्वात भ्रष्ट्राचारी सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.