रेल्वे रुळावरून गॅस सिलिंडर ठेऊन कालिंदी एक्सप्रेस रुळावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक्सप्रेसने सिलिंडरला धडक देताच ते रेल्वे रुळाच्या बाजुला फेकले गेले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर कालिंदी एक्सप्रेस जवळपास २० मिनिटे थांबवण्यात आली होती. दरम्यान, घटनास्थळावरून रेल्वे पोलिसांनी सिलिंडर जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानपूरमधील शिवराजपुरा भागात घडली घटना

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ८ च्या सुमारास उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील शिवराजपुरा भागात ही घटना घडली. कालिंदी एक्सप्रेस भिवानीवरून प्रयागराजच्या दिशेन जात होती. यादरम्यान, एक्सप्रेस शिवराजपुरा भागात येताच रेल्वे रुळावर सिलिंडर असल्याचे लोको पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळे चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबले. पण त्यापूर्वीच एक्सप्रेसने सिलिंडरला धडक दिली होती. त्यामुळे सिलिंडर रेल्वे रुळाच्या बाजुला जाऊन पडले आणि मोठा अनर्थ टळला.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
Gas leak causes fire in house in Chembur old person injured
चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी
Boy killed in gas cylinder blast karad
गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

हेही वाचा – Durg News : दोन मित्र रेल्वे रुळावर बसून मोबाईलवर खेळत होते व्हिडीओ गेम; ट्रेन आली अन् घडली धक्कादायक घटना

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

रेल्वे थांबताच लोको पायलटने याची माहिती रेल्वेच्या गार्ड आणि गेटमनला दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी जवळपास २० मिनिटे गाडी थांबवून ठेवण्यात आली होती. घटनास्थळावरून रेल्वे पोलिसांनी सिलिंडर जप्त केले असून अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी रेल्वे पोलिसांना पेट्रोलची बॉटल आणि माचीसही मिळाली आहे. त्यामुळे कालिंदी एक्सप्रेसचा अपघात घडवून आणण्याचा कट होता की काय? अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – धावत्या रेल्वेतून उतरत होता वृद्ध व्यक्ती अन् स्थानकावर नाचत होता तरुण….पुढे जे घडले ते व्हिडोओमध्ये पाहा

समाजकंटकांकडून रेल्वे गाड्या रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न

दरम्यान, गेल्या दिवसांपासून समाजकंटकांकडून रेल्वे गाड्या रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. १६ ऑगस्ट रोजी कानपूर झांसी मार्गावरही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून खाली घसरले होते. या घटनेत काही जण जखमी झाले होते. या घटनेच्या एका आठवड्यानंतर २३ ऑगस्ट रोज कांसगंज रेल्वेमार्गावरही लाकडं ठेवण्यात आली होती. तेव्हाही मोठी दुर्घटना टळली होती. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. दोघांनी दारुच्या नशेत रेल्वे रुळावर लाकडं ठेवल्याचे कबूल केलं होतं.