दक्षिण काश्मीरमधल्या वेगवेगळया भागातून गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांचे अपहरण केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने दहशतवादी सय्यद सल्लाउद्दीनच्या दुसऱ्या मुलाला अटक केल्यानंतर दहशतवाद्यांनी अशा प्रकारची कृती केली आहे. पोलिसांनी लगेचच यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दहशतवाद्यांनी शोपियन, कुलगाम, अनंतनाग आणि अवंतिपोरा भागातून पाच जणांचे अपहरण केले आहे. या पाचही जणांच्या कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य जम्मू-काश्मीर पोलीस दलात नोकरी करतात. अपहरण झालेल्यांमध्ये पोलीस उपअधीक्षकाच्या भावाचा समावेश आहे.

या प्रकारानंतर दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा यंत्रणांची गुरुवारी संध्याकाळी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये अपहरण झालेल्यांना शोधून काढण्यासाठी शुक्रवारपासून मोठया प्रमाणावर शोध मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader