जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हलमतपोरा येथे सुरु असलेल्या चकमकीत भारताने आपले चार जवान गमावले आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे दोन आणि लष्कराचे तीन असे एकूण पाच जवान शहीद झाले आहेत. दोन पोलिस या चकमकीत जखमी झाले आहेत. कुपवाडयाच्या जंगल भागात काल रात्रीपासून सुरक्षापथकांबरोबर सुरु असलेल्या चकमकीत चार दहशतवादीही ठार झाले.

लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरु झाली अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.

लष्कराचे पॅरा कमांडोही या कारवाईत सहभागी झाले आहेत. या भागात सात दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल आणि एसओजीने संयुक्तपणे शोध मोहिम सुरु केली होती.

Story img Loader