Crime News एका महिलेचा अत्यंत क्रूर पद्धतीने छळ करण्यात आला आहे. छळ करणारे लोक तिच्या सासरचेच आहेत. या महिलेला तिच्या नवऱ्याने मारहाण केली. त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली आणि लोखंडी रॉडने चटके दिले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी नेमकं काय सांगितलं? कुठे घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने तिचा सासरच्या लोकांकडून आणि नवऱ्याकडून प्रचंड छळ झाल्याचं सांगितलं. तसंच तिच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. तसंच तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली आणि लोखंडी रॉडने चटके दिले. पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना मध्य प्रदेशातील राजगढ या ठिकाणी घडली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीविरोधात आणि सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला तिच्या पतीने, सासू सासऱ्यांनी आणि नणंदेने मारहाण केली. त्यानंतर तिचा लैंगिक छळ केला.

ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Muslims of Mumbra on streets to protect Hindus in Bangladesh
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यातील मुस्लीम रस्त्यावर
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Two youths from Motala taluk along with international Attal gang robbed National Bank in Telangana state
तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील

या महिलेने काय सांगितलं?

या महिलेने सांगितलं, “मला माझ्या सासरच्या लोकांनी निर्वस्त्र केलं. त्यानंतर मला मारहाण करण्यात आली. मला लाथा मारण्यात आल्या तसंच ठोसेही लगावण्यात आले. तेवढ्यावरच माझा नवरा, सासू आणि नणंद, तसंच सासरे थांबले नाहीत. त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकली आणि मला लोखंडी रॉडने चटके दिले. माझ्या सासूने मला लोखडी रॉडने चटके दिले. प्रायव्हेट पार्ट्सानाही चटके दिले. तर सासऱ्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली.” असं या पीडितेने सांगितलं. ही घटना १३ डिसेंबरला घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील राजगढमध्ये घडली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- Panvel Minor Girl Molested : पनवेलमध्ये रिक्षाचालकाकडून ओळखीच्या बालिकेवर अत्याचार

आई वडिलांकडे कशी पोहचली महिला?

मध्ये प्रदेशातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या सासऱ्यांनी त्या महिलेला नंतर बाईकवर बसवलं आणि एके ठिकाणी सोडून दिलं. ती बेशुद्ध अवस्थेतच होती. तिला एका माणसाने पाहिलं आणि ही महिला कोण आहे ते ओळखलं. तिच्या आई वडिलांना याबाबत माहिती दिली. ज्यानंतर ही महिला कशीबशी तिच्या माहेरी पोहचू शकली. माहेरी गेल्यानंतर तिने आई वडिलांना सगळा प्रकार सांगितला. ज्यानंतर मध्य प्रदेशातील राजगढ या ठिकाणी पोलिसांत तक्रार करण्यात आली. या महिलेला दोन दिवस मारहाण केली जात होती आणि नग्न करुन तिचा लैंगिक आणि शारिरीक छळ केला जात होता असंही तिने सांगितलं आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२) च्या अंतर्गत आणि कलम ७४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तसंच कलम ६४ जे बलात्काराचं कलम आणि कलम ३ (उपकलम ५) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader