समाजात विकृती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच हरयाणातील मेवाट जिल्ह्यात एका बकरीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. आता मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात सुथालिया येथे एका गायीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानवी कृत्यामध्ये गावातील एक वयोवृद्ध व्यक्ती सहभागी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार शुक्रवारी रात्री सुथालिया भागातील एक स्थानिक व्यावसायिक घरी परतत असताना त्यांचे गावच्या मंदिराजवळ लक्ष गेले. तिथे छोटे खान हा वयोवृद्ध व्यक्ति गायीबरोबर अनैसर्गिक सेक्स करत असल्याचे त्यांनी पाहिले. गावातील मंदिराजवळ हा सर्व प्रकार सुरु होता. महेश अग्रवाल या प्रत्यक्षदर्शीने छोटे खानला हे अमानवीय कृत्य करताना पाहिल्यानंतर त्यांनी त्याला हटकले.

आणखी काही जणही तिथे होते. ते सुद्धा छोटे खानची ही विकृती पाहत होते. शनिवारी दुपारी अडीजच्या सुमारास ही बातमी संपूर्ण गावात वेगाने पसरली. त्यानंतर संतप्त झालेले गावकरी मुख्य बस स्थानकाजवळ जमले आणि त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. पोलिसांना याबद्दल समजल्यानंतर पोलीस तिथे आले व त्यांनी आरोपी विरोधात कारवाई करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले. त्यानंतर पोलिसांनी छोटे खानला अटक केली असून त्याच्याविरोधात कलम २९५, कलम ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In madhya pradesh cow raped by man