मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रामपुरा गावात एका नवरदेवाला निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्याचा दोष इतका होता की, वरात निघण्यापुर्वी तो घोड्यावर बसून कुलदेवताचे दर्शन घेण्यास एका गल्लीतून जात होता. त्या गल्लीत एका घरात शोकाकूल वातावरण होते.

शोकाकूल वातावरणात घरासमोरून नवरदेव जात असल्यामुळे त्यांना आवडले नाही. त्यामुळे नवरदेव असलेल्या बलराम पटेल यांना गावातील मुकेश यादव, चंदन यादव, रानू यादव यांनी रोखले. आमचे कुटुंब दुख:त असतांना तुम्ही आनंद कसा साजरा करत आहात, असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाले. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मुकेश यादव आणि चंदन यादव यांनी नवरदेवाला लाता बुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर नवरदेव बलराम पटेल याने लग्नाची मिरवणूक सासरच्या घरी न नेता नातेवाईकांसह शेट पोलीस स्टेशन गाठले. तसेच आरोपी चंदन यादव, मुकेश यादव आदींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader