मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला असाही आरोप आहे. ४ मे ची ही घटना बुधवारी (१९ जुलै) उघड झाली कारण या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. मन सुन्न करणारी ही घटना देशात घडलेली असतानाच ५ मे रोजीही अशीच एक घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. ही तक्रार करणाऱ्या कुटुंबाने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की आत्तापर्यंत या प्रकरणात काय प्रगती झाली आहे ते आम्हाला माहित नाही.

हे पण वाचा- Manipur : “जमावाने पती आणि मुलाची हत्या केली, मुलीला घेऊन गेले आणि…”, पीडितेच्या आईने सांगितली वेदनादायी आठवण

इंफाळच्या पूर्व भागात असलेल्या एका पोलीस ठाण्यात जी सामूहिक बलात्काराची FIR नोंदवण्यात आली ती संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठीही एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला. पोलीस सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. इंफाळ पूर्वचे पोलीस अधीक्षक शिवकांत यांनीही इंडियन एक्स्प्रसेच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत. बलात्कार किंवा महिला अत्याचारांविषयीची झीरो FIR ही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येते. त्यासाठी गुन्हा कुठल्या हद्दीत घडला त्याची सीमा नाही. मणिपूरच्या हिंसाचारा दरम्यान अशीच एक झीरो FIR दाखल करण्यात आली जी संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग होण्यासाठी एक महिना गेला.

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…

हे पण वाचा- “दीपिकाच्या भगव्या बिकिनीने धर्म धोक्यात आला, पण…”; मणिपूर घटनेवर मौन बाळगणाऱ्या कंगनावर गायिकेची टीका; म्हणाली…

दोन पीडित मुलींच्या आईने तक्रार दाखल केली. मणिपूरमध्ये १६ मे २०२३ या दिवशी दोन कुकी जोमी महिलांविषयीची ही तक्रार होती. या दोन महिलांचं वय अनुक्रमे २१ आणि २४ वर्षे होतं. अपहरण, बलात्कार आणि हत्या अशा कलमांच्या अन्वये ही FIR दाखल करण्यात आली. कार धुण्याचं काम करणाऱ्या या दोन महिलांवर काही अज्ञातांनी सामूहिक बलात्कार केला. या लोकांची संख्या १०० ते २०० होती असंही या FIR मध्ये म्हटलं आहे.

१६ मे २०२३ रोजी करण्यात आलेली FIR ही १३ जून २०२३ ला म्हणजेच जवळपास महिनाभराने इंफाळच्या पूर्व जिल्ह्यात पोरोम्पैट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पीडित मुलीच्या चुलत भावाने इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं की पोलीस ५ मे च्या घटनेनंतर दोन आठवड्यांनी आमच्याशी बोलले. त्यावेळी आम्हाला पोलिसांनी दोन मुलींची ओळख पटवण्यासाठी मृतदेहांचे दोन फोटो दाखवले. आम्ही त्यांची ओळख पटवली होती. पीडित मुलीच्या भावाने हे देखील सांगितलं की आम्हाला शवविच्छेदन अहवालाची प्रतही दिली गेली नाही.