अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी जनसमुदायाचा पाठिंबा आणि जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद(विहिंप) उत्तरप्रदेशातील लहान-लहान भागात जाऊन मोहिम राबवणार आहे. राम नवमी साजरी होण्याआधी संपूर्ण देशभरातून अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी जनपाठिंबा उभा करण्याचा मानस विहिंपचा आहे. श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमाअंतर्गत उत्तरप्रदेशात ठिकठिकाणी विहिंपतर्फे मोहल्ला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात जिल्हा पातळीवर उपखंड, खंड आणि प्रखंड अशा तीन स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती विहिंपचे सचिव सुरेंद्र जैन यांनी दिली आहे. अयोध्येत राम जन्मभूमीच्या मोहिमेसाठी स्थानिक पातळीवर प्रबोधन करणे हा मोहल्ला स्तरावर राम जन्मोत्सव उत्सव साजरा करण्यामागाचा उद्देश असल्याचे सुरेंद्र जैन यांनी सांगितले.
मार्च महिन्यात पंधरा दिवस हा कार्यक्रम देशभर होणार असून, यामध्ये विहिंप नेते नागरिकांमध्ये विहिंप आणि राम जन्मभूमीबाबत जागरुकता तसेच आपल्या घरवापसी अभियानाचा प्रचार करणार आहेत.

Story img Loader