Pavithra Gowda and Actor Darshan Case: कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा आणि त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री पवित्रा गौडा यांना सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश पाठविणाऱ्या चाहत्याची जून महिन्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर कर्नाटक चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. अभिनेता दर्शन, अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यासह एकूण १७ जण या गुन्ह्यात आरोपी आहेत. मृत चाहता ३३ वर्षीय रेणुकास्वामी याचा खून होण्यापूर्वी घेतलेला एक फोटो सध्या समोर आला आहे. मारेकऱ्यांनी रेणुकास्वामीला विवस्त्र करून मारहाण केली होती. मरण्यापूर्वी आपल्याला सोडून द्यावे, अशी गयावया करताना रेणुकास्वामी या फोटोंमध्ये दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर रिक्षाचालक असलेल्या रेणुकास्वामीच्या पालकांनी एकच टाहो फोडला. हा हत्येमध्ये दर्शनचा सहकारी असलेल्या एका आरोपीच्या मोबाइलमधून हे फोटो पोलिसांना मिळाले.

आरोपीच्या मोबाइलमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी या संदर्भात आपली भूमिका अद्याप जाहिर केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहआरोपी पवन याने रेणुकस्वामीचे अपहरण केल्यानंतर त्याचा छळ करत असतान हे फोटो घेतले होते. त्यानंतर पवनने अभिनेता दर्शन पार्टी करत असलेल्या क्लबमध्ये जाऊन त्याला हे फोटो दाखवले. अभिनेता दर्शनने अभिनेत्री पवित्रा गौडाच्या घरी जाऊन तिलाही हे फोटो दाखवले. त्यानंतर दोघेही रेणुकास्वामीला ज्या ठिकाणी बंदिस्त केले होते, तिथे पोहोचले आणि दोघांनी पुन्हा त्याच्यावर अत्याचार केले.

pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
baba siddiquie murder plan
Baba Siddhique Murder case: ‘असा’ रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; हल्लेखोरानं कबुलीजबाबात सांगितला संपूर्ण घटनाक्रम!
Mohit Kambo
बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव, हत्येच्या काही तास आधी चर्चा; मोहित कंबोज यांचं कथित आरोपांवर स्पष्टीकरण
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला

हे वाचा >> Kannada Actor Darshan : अभिनेता दर्शन थूगुदीपाला तुरुंगात मिळतेय ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कर्नाटक पोलिसांनी आरोपपत्रामध्ये रेणुकास्वामीवर केलेल्या अत्याचारांची विस्तृत माहिती दिली आहे. रेणुकास्वामीच्या छातीमधील हाते मोडली होती. त्याच्या शरीरावर एकूण ३९ जखमा होत्या. तसेच डोक्यावरही एक मोठी जखम होती, अशी माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. याशिवाय दर्शन आणि त्याच्या मित्रांनी विजेचा धक्का देण्यासाठी एक उपकरण आणले होते. मारहाणीमुळे बेशुद्ध पडताच उपकरणाच्या साहाय्याने रेणुकास्वामीच्या गुप्तांगाला विजेचा धक्का दिला जायचा.

हे ही वाचा >> चाहत्याच्या खूनप्रकरणी अभिनेता दर्शन व त्याच्या गर्लफ्रेंडला सहा दिवसांची पोलीस कोठडी, जाणून घ्या हत्येचा घटनाक्रम

पवित्रा गौडालाही अशाच यातना होतील

रेणुकास्वामीचे फोटो जेव्हा त्याच्या पालकांनी पाहिले, तेव्हा त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. माझ्या मुलाने त्याची चूक मान्य करून माफी मागीतल्यानंतरही त्याचा छळ का केला? त्याला विजेचा धक्का देऊन मारण्यात आले. त्याच्या शरीराचा एकही भाग सोडला नाही, जिथे त्याला मारलं नाही. माझ्या मुलाला अतिशय हालहाल करून मारणाऱ्या आरोपींना न्यायालय कठोर शिक्षा देईल, अशी भावना रेणुकास्वामीच्या आईने व्यक्त केली. तसेच अभिनेत्री पवित्रा गौडा आणि इतर आरोपींनाही अशाच प्रकारच्या यातना होतील, अशी संतप्त भावना आईने व्यक्त केली.

Story img Loader