पीटीआय, भुवनेश्वर
दिवाळीच्या दिवशी ओडिशात विविध ठिकाणी झालेल्या आगीच्या घटनांमध्ये कमीत कमी दोन जणांचा मृत्यू, तर ५० जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये लाखोंच्या मालमत्तेची राखरांगोळी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुरी शहरातील बटगाव येथे फटाक्याच्या स्फोटानंतर आग लागल्याच्या घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान फटाका स्फोटाची चौकशी सुरू असून बेकायदा फटाके निर्मितीत सहभागी लोकांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

train hits student sitting on track with headphones
हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला, कुटुंबानं एकुलता मुलगा गमावला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Kanpur Fire
Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
BMTC bus driver heart attack death
प्रवाशांनी भरलेली बस चालवताना ड्रायव्‍हरचा हार्ट अटॅकने मृत्‍यू; कंडक्टरच्या एका कृतीनं अनर्थ टळला, थरारक VIDEO व्हायरल

हेही वाचा :Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज

२५ दुकानांची राखरांगोळी

● शुक्रवारी सकाळी भुवनेश्वरमधील बाजारात आग लागल्यामुळे जवळपास २५ दुकानांची राखरांगोळी झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी अतोनात नुकसान झाले.

● राजधानीच्या विविध भागांत फटाक्यांशी संबंधित घटनांमध्ये युवक, युवती आणि मुलांसह अनेक लोक होरपळले. प्राथमिक उपचाराअंती लोकांना सुट्टी देण्यात आली, तर काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

● रायगढा येथील घटनेत एका स्टेशनरीच्या दुकानाला आग लागली. या दुकानातून पेट्रोलची विक्री होत होती. फटाके फोडतेवेळी ही आग लागली अशी माहिती पोलिसांनी दिली.

● बालासोर जिल्ह्यातही फटाक्यांशी संबंधित घटनांमध्ये ८ जण जखमी झाले. जखमींमध्ये अधिकांश अल्पवयीनांचा समावेश आहे.

हेही वाचा :Priyanka Gandhi: प्रियंका गांधींची प्रचार मोहीम ३ नोव्हेंबरपासून

कोलकाता पोलिसांकडून ६०१ जणांना अटक

पीटीआय, कोलकाता
प्रतिबंधित फटाके फोडून बेशिस्त वर्तन केल्याबद्दल कोलकाता पोलिसांनी शुक्रवारी सकाळपर्यंत ६०१ जणांना अटक केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या वेळी ७०० किलोपेक्षा जास्त प्रतिबंधित फटाक्यांसह ७९.४ लिटर दारू जप्त केली आहे. तसेच शहरातील विविध भागांतून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८००हून अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी काली पूजा आणि दिवाळी साजरी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पोलिसांनी २६५ जणांना फटाके फोडल्याबद्दल, ३२८ लोकांना बेशिस्त वर्तनामुळे अटक केली.

Story img Loader