पीटीआय, महाकुंभ नगर
प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आतापर्यंत १० कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारने दिली. गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली.
यात्रेकरूंची संख्या दिवसागणिक वाढत असून, दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी आणि आध्यात्मिक पुण्य प्राप्तीसाठी येत असल्याचे सरकारने निवेदनात म्हटले आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने यंदाच्या महाकुंभला ४५ कोटींहून भाविक येतील असा अंदाज यापूर्वी व्यक्त केला आहे. देशासह जगभरातून भाविक मोठ्या उत्साहात आणि हिरिरीने दाखल होऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान घेत आहेत.
हेही वाचा : ‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब
समरसता, एकतेचा संदेश देणारा सोहळा शाह
कुंभ सौहार्द आणि एकतेचा संदेश देतो, कारण तुम्ही कोणत्या धर्माचे, पंथाचे किंवा जातीचे आहात हे कोणी विचारत नाही. कोणताही भेदभाव न करता अन्न मिळेल. महाकुंभापेक्षा समरसतेचा आणि एकतेचा संदेश देणारा कोणताही सोहळा या जगात नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.