पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत केले. तसेच त्यांची गळाभेट घेत, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केलं. पुतिन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – दिल्लीत महात्मा गांधींचा भव्य पुतळा उभारण्याची योजना रद्द, PWD ने दिलं चक्क ‘हे’ कारण

पंतप्रधान मोदी हे दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून ते सोमवारी मॉस्को येथे दाखल झाले. त्यानंतर ते पुतिन यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. पुतिन आणि मोदी यांनी गळाभेटही घेतली. व्लादिमीर पुतिन म्हणाले, सर्वप्रथम तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मला वाटतं की हा विजय काही योगायोग नाही. हा निकाल तुमच्या सरकारच्या अनेक वर्षांच्या कामाची पोचपावती आहे. देशातील जनतेसाठी भल्यासाठी काय करायला हवं, याची जाणीव तुम्हाला आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य देशातील जनतेसाठी समर्पित केलं आहे आणि भारतातील जनतेलाही याची जाणीव आहे.

पुतिन यांच्या स्वागतानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. पुतिन यांनी ज्याप्रकारे माझं स्वागत केलं, ते बघून मी भारावून गेलो आहे. या स्वागतासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. बदल घडवणं हे माझं आयुष्याचे ध्येय आहे. देशातील जनतेने माझ्या योजनांचा स्वीकार करत मला तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा – प्रादेशिक शांततेसाठी पूरक भूमिका! शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी हे रशियात पोहोचले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी हे रशिया आणि भारत यांच्यातील २२ व्या शिखर संम्मेलनात सहभागी होणार आहेत. यावेळी दोन्ही देशातील आर्थिक व राजनीतीक संबंध मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांचा भर असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In russia vladimir putin meet pm modi congratulated for winning loksabha election spb
Show comments