Lok Sabha Session Updates : १८ व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू झाले आहे. पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी, २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, नव्या संसदीय अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची आठवण काढली आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर शरद पवारांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला होता. हा सल्ला त्यांच्यासाठी आजही तितकाच महत्त्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी आज एक एक्स पोस्ट केली आहे.

“लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्या वेळी निवडून देऊन मला लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. कृतज्ञतापूर्वक हे नमूद करते की, माझ्यावर मतदारांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. मला आजही लक्षात आहे की, जेव्हा मी २००९ साली पंधराव्या लोकसभेत पहिल्यांदा खासदार म्हणून पाऊल ठेवले तेव्हा आदरणीय पवार साहेब यांनी मला एक शिकवण दिली”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचे ते वाक्य आठवले.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi
Ex PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

हेही वाचा >> Parliament Session 2024 LIVE Updates : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात, मोदींनी घेतली खासदारकीची शपथ, काँग्रेसची संसदेबाहेर ‘संविधाना’साठी घोषणाबाजी

सुप्रिया सुळे नेमकं पोस्टमध्ये काय म्हणाल्या?

“सुप्रिया, तु खासदार म्हणून चालली आहेस. गेट नंबर एक ने आत जाऊन लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस. एक कायम लक्षात ठेव की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे तुला ही संधी मिळाली आहे. दरवेळी पायऱ्या चढताना याची जाणिव ठेव.” मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रवेश करते तेव्हा तेव्हा साहेबांची ही वाक्ये मला आठवतात. या निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा लोकांच्यावरील असलेला विश्वास अधिक दृढ झाला. आपण योग्य मार्गावर असाल तर लोक तुम्हाला आयुष्यभर साथ-सोबत करतात याचाही प्रत्यय आला. ही खासदारकी जनतेच्या कामासाठी आहे, पुढील पाच वर्षांतील प्रत्येक क्षण हा केवळ जनतेसाठी आणि जनहिताच्या कामासाठी गेला पाहिजे याकडे माझा कटाक्ष असणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हा सर्वांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा आदर्श घालून दिला आहे. हे सुत्र कायम डोळ्यांसमोर ठेवून चालण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते.

हेही वाचा >> Maharashtra News Live : “ओबीसीने कधी महाराष्ट्रात दंगली घडवल्या आहेत का?”, लक्ष्मण हाकेंचा सवाल

सलग चौथ्या वेळी संसदेत प्रवेश करीत असताना मला वाढत्या जबाबदारीची जाणिव आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिल. लोकहिताचे मुद्दे संसदीय चौकटीत राहून मात्र अत्यंत आग्रही पणे सभागृहात मांडून त्याची तड लावण्यासाठी मी सदैव कार्यरत असेन. लोकांनी माझ्यावर वेळोवेळी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी यापुर्वी देखील मी अविरतपणे काम केले आहे. हा वसा यापुढील काळात देखील कायम राहिल, हे वचन यानिमित्ताने देते. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.

या निवडणूकीत प्रचारासाठी अक्षरशः जीवाचे रान करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, विविध राजकीय संघटना यांसह सर्व सहकारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतमंडळी, प्रिंट-टिव्ही-इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्वच हितचिंतक सर्वांचे मनापासून आभार. यापुढील काळातही आपले सहकार्य असेच मिळत राहील ही अपेक्षा. धन्यवाद.

Story img Loader