ISRO SpaDeX Docking Mission Updates : २०३५ पर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असण्याचं उद्दीष्ट्य आहे. त्यासाठी डॉकिंग क्षमता महत्त्वाची आहे. एकाच वेळी प्रक्षेपित करता येणे शक्य नसणाऱ्या जड अंतराळयानाचे भाग आणि उपकरण मोहिमांसाठी ‘डॉकिंग’ आवश्यक असते. उदाहरणार्थ- इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) मध्ये वेगवेगळी मॉड्युल्स असतात, जी स्वतंत्रपणे लाँच केली जातात आणि नंतर ती अवकाशात एकत्र आणली जातात. यासाठी आजचा दिवस भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी महत्त्वाचा आहे. कारण, चेजर आणि टार्गेट हे दोन स्पडेक्स सॅटेलाईट्सचं डॉकिंग प्रयोग करण्यात येणार आहे. येत्या काही तासांत डॉकिंग पूर्ण होणार आहे. यामुळे स्पेस डॉकिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, SpaDeX मिशन ही दोन लहान अंतराळयानांचा वापर करून इन-स्पेस डॉकिंगच्या प्रात्यक्षिकासाठी एक फायदेशीर तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मिशन आहे. हे तंत्रज्ञान भारताच्या अंतराळ महत्त्वाकांक्षेसाठी आवश्यक आहे. त्यादृष्टीने चेझर आणि टार्गेट हे दोन स्पेडेक्स सॅटलाईट एकमेकांच्या ३ मीटरच्या जवळ आले आहेत. थोड्याच वेळात त्यांचं यशस्वी डॉकिंग होणार आहे.
SpaDeX Docking Update:
— ISRO (@isro) January 12, 2025
A trial attempt to reach up to 15 m and further to 3 m is done.
Moving back spacecrafts to safe distance
The docking process will be done after analysing data further.
Stay tuned for updates.#SpaDeX #ISRO
डॉकिंगचा उपयोग कुठे?
३० डिसेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश लहान अंतराळ यानाचा वापर करून इन-स्पेस डॉकिंगचे प्रात्यक्षिक करणे आहे. मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावरून नमुने आणणे, स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणे यासारख्या भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणारा भारत देश अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश असेल. डॉकिंग-अनडॉकिंग क्षमता भविष्यातील मोहिमांसाठी आवश्यक आहे. कारण एकाच वेळी प्रक्षेपित करता येणे शक्य नसणाऱ्या जड अंतराळयानाचे भाग आणि उपकरणांचे काही मोहिमांसाठी ‘डॉकिंग’ आवश्यक असते.
हेही वाचा >> इस्रो इतिहास रचणार; अंतराळात जोडणार दोन स्पेसक्राफ्ट, ‘Spadex Mission’ भारतासाठी किती महत्त्वाचे?
नियोजित भारतीय अंतरिक्ष स्थानकामध्ये पाच मॉड्युल्स असतील, जी अंतराळात एकत्र आणली जातील. त्यापैकी पहिले मॉड्युल २०२८ मध्ये प्रक्षेपित होणार आहे. इस्रो ही क्षमता त्याच्या पुढील चांद्र मोहिमेसाठीदेखील वापरेल. त्या मोहिमेदरम्यान इस्रो नमुने परत आणण्याची योजना आखत आहे. चांद्रयान-४ ला दोन स्वतंत्र प्रक्षेपणे आणि अंतराळात डॉकिंग करण्याची आवश्यकता भासेल.