Uttar Pradesh : सेल्फी काढण्याचा मोह अनेकदा जीवावर बेततो. गेल्या काही दिवसांत सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशातच आता उत्तर प्रदेशमध्येही सेल्फी काढण्याच्या मोहापायी एक सरकारी अधिकारी गंगा नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. आदित्य वर्धन सिंह असं या सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे. ते उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

टाईम्स ऑफ इंडियाने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी उन्नावच्या बिल्लोर जिल्ह्यातील नानामऊ घाटावर ही घटना घडली. आदित्य वर्धन सिंह त्यांच्या मित्रांसह या घाटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी एका मित्राला फोटो काढण्यात सांगितले आणि पोज देण्यासाठी ते आणखी खोल पाण्यात गेले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचा तोल गेला आणि ते वाहून गेले.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम

हेही वाचा – Supreme Court : “आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे कायद्याविरोधात”, सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सरकारवर ताशेरे

आदित्य वर्धन सिंह यांच्या मित्रांनी लगेच तिथे असलेल्या खासगी डायव्हर्सकडे मदत मागितली. मात्र, त्यांनी आदित्य यांना वाचवण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्यांच्या मित्रांकडे १० हजार रुपये नगदी नसल्याने डायव्हर्सनी त्यांना जवळच्या दुकानात जाऊन ऑनलाईन पेमेंट करण्यात सांगितले. मात्र, या व्यवहारात १० ते १५ मिनिटे वेळ वाया गेल्याने या दरम्यान आदित्य वर्धन सिंह बराच दूर वाहून गेले होते.

यासंदर्भात बोलताना उन्नावचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार सिंह म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार, आदित्य वर्धन सिंह यांना सूर्याला जल देताना फोटो काढायचा होता. यासाठी ते खोल पाण्यात गेले. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचा तोल गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गेल्या ७२ तासांपासून त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही.

हेही वाचा – Uttar Pradesh : लखनौमधील विद्यापीठात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, वसतीगृहात आढळला महाराष्ट्र कॅडरच्या IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा मृतदेह

दरम्यान, खासगी डायवर्स हे आदित्य वर्धन सिंह यांना वाचवू शकले असते. मात्र, पैशांच्या लालचेपोटी त्यांनी पाण्यात उतरण्यास उशीर केला. त्यामुळे आदित्य बराच दूर वाहून गेले, असा आरोप त्यांच्या मित्रांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे आदित्य यांच्या मित्रांनी केलेल्या आरोपानंतर आम्ही तपास सुरू केला असून त्यात तथ्य आढळल्यास खासगी डायवर्सवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती बिल्लोरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार त्रिवेदी यांनी दिली आहे.