बलात्कार प्रकरणातील एका २२ वर्षीय आरोपीने पीडित कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, तर इतर सदस्य जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे ही घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे या गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीने स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केली आहे.

हेही वाचा – काश्मीरमध्ये सहा दहशतवादी ठार; दोन जवान शहीद

A five year old boy was molested by minors Pune print news
पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
man dies in kerala hospital after treated by fake doctor
धक्कादायक! १२ वर्षांपासून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करू न शकणाऱ्या बोगस डॉक्टरकडून रुग्णावर उपचार; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Rape on 10 months girl
10 Months Girl Rape : धक्कादायक! १० महिन्यांच्या मुलीवर बलात्कार, ३० वर्षांचा नराधम अटकेत, कुठे घडली घटना?
monkeypox case confirmed in kerala
Monkeypox : केरळमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; गेल्या आठवड्यात यूएईवरून भारतात झाला होता दाखल
Army officers assaulted and woman gangraped madhya pradesh
Army officers assault Case: ‘बलात्कारी आरोपीला गोळी घाला, नाहीतर मला मारा’, अत्याचारानंतर लष्करी जवानाची मैत्रीण धक्क्यात
Sexual assault with 10-year-old minor girl in Nalasopara two people arrested
नालासोपाऱ्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक
badlapur rape case marathi news
मैत्रिणीकडून गुंगीचे औषध, मित्रांकडून बलात्कार; बदलापुरातील खळबळजनक घटना, आरोपी अटकेत

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उन्नाव येथे बलात्कार प्रकरणातील एका २२ वर्षीय आरोपीने पीडित परिवारातील सदस्यांवर गोळीबार केला आहे. आरोपी हा गेल्या एक वर्षापासून प्रकरणात तुरुंगात होता. दोन महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. सोमवारी सकाळी त्याने पीडित परिवाराच्या घरी जात अचानक घरातील सदस्यांवर बंदुकीने गोळ्या झाडल्या. या घटनेत ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर इतर तीन सदस्य गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर आरोपीने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांना त्याचा मृतदेह जवळच्याच एका घरात मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गोळीबार करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये आपल्यावर बलात्काराचे खोटे आरोप करण्यात आल्याचे त्याने म्हटले होते. तसेच पीडित परिवारावर गोळीबार केल्याची कबुलीही त्याने दिली.

हेही वाचा – हाथरस दुर्घटनेप्रकरणी राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पत्र; म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारने…”

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात बोलताना उन्नावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रेमचंद म्हणाले, सोमवारी सकाळी पीडित परिवाराच्या घरी गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपीने तेथून पळ काढला होता. पोलिसांनी सर्वप्रथम परिवारातील चारही जणांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच याप्रकरणातील आरोपीनेही आत्महत्या केली असून आम्ही त्याचा मृतदेहही ताब्यात घेतल्याची माहितीही पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिली.