मुस्लीम समाजातील विद्यार्थ्याला भर वर्गात थप्पड मारल्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. विद्यार्थ्याच्या वर्गमित्रानांच थप्पड मारण्यास सांगणाऱ्या त्रिप्ता त्यागी (६०) या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या मालकीच्या नेहा पब्लिक स्कुल या शाळेविरोधात कारवाईबाबत चाचपणी करण्यात येत आहे. दरम्यान, या शाळेला कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षिकेची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर आता तक्रार मागे घेण्यासाठी गावकऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे वृत्त समोर येत आहे.

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

आरोपी शिक्षिकेने मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं केलं. यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन या विद्यार्थ्याला मारण्यास सांगितले. तसेच मी तर आता जाहीर केलं आहे की, या मुस्लीम मुलांनी त्यांच्या भागात (मुस्लीम वस्तीत) जावं. शिक्षिकेच्या आदेशानंतर वर्गातील एका मुलाने पीडित मुस्लीम मुलगा रडत असतानाही त्याच्या तोंडावर चापट मारली. यानंतर शिक्षिका त्या मुलाला म्हणाली की, तू असं काय मारतो आहेस, जोरात मार. यानंतर आणखी दोन मुलं उठली आणि त्यांनीही पीडित मुलाला मारहाण केली.

Seven hundred women cheated, Mudra loan, case against a woman,
मुद्रा लोनच्या नावाखाली सातशे महिलांना २५ लाखांस गंडविले, सोलापुरात भामट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Baba Siddiqui murder case, Five more people arrested,
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक, गोळीबार करणाऱ्यांना पिस्तुल पुरवल्याचा आरोप
ulta chashma
उलटा चष्मा: ‘पुन्हा संधी’ नकोच!
Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं

हेही वाचा >> संतापजनक! उत्तर प्रदेशमधील शाळेत द्वेषाचे धडे, भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला उभं केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना….

जातीवादी उच्चार करून मुलाला थप्पड मारल्याप्रकरणाचा प्रकार समोर आल्यानंतर याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु, तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी या कुटुंबियांच्या घरी राजकारणी, गावातील नेते, मीडिया आणि स्थानिकांनी पीडित मुलाच्या वडिलांची भेट घेतली. शिक्षिकेविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी या पुढाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

काय म्हटलं स्थानिक पुढाऱ्यांनी?

“आता हे नाटक बंद करा. आम्हाला या गावात मीडिया नकोय. पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याची गरज नसल्याचं सांगून या. दाखल केलेला गुन्हा मागे घ्या. नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील”, असा धमकी वजा इशाराच पुरा गावचे प्रमुख नरेंद्र त्यागी यांनी दिला आहे.. तर, दुसरीकडे आरएलडी आणि भीम आर्मीने या कुटुंबाला समर्थन दिलं आहे.

हेही वाचा >> “…म्हणून मी मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली”, आरोपी शिक्षिकेचं स्पष्टीकरण

शिक्षिकेविरोधात कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा?

शिक्षिकेविरोधात आयपीसी कलम ३२३ (दुखापत करणे), ५०४ (हेतुपुरस्सर शांतता भंग करणे) अंतर्गत मुलाच्या जबानीनुसार आणि वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याकडून शांतता बैठक

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शनिवारी शांतता बैठक आयोजित केली होती. या प्रकरणात तडजोड करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच, शिक्षिकेविरोधातील तक्रारही मागे घेण्यास सांगण्यात आले आहे.

पीडित मुलाचे वडिल काय म्हणाले?

“शिक्षिकेविरोधात कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा नाही. मी एक शेतमजूर आहे. माझा मुलगा आणि त्याचा चुलत भाऊ तिथे गेले काही वर्षे शिक्षण घेत आहेत. फक्त शिक्षकांनी माफी मागावी आणि याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे”, असं वडिलांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

“माझ्या पुतण्याने व्हिडीओ शूट केला आणि गुरुवारी मला दाखवला. माझ्या मुलाला ओळखीवरून मारहाण होत असल्याचे पाहून आम्हाला धक्काच बसला. त्याने गृहपाठ केला नसल्याने त्याचा अपमान करण्यात आला. परंतु, याआधी गावात असं कधीच घडलं नव्हतं. आपण आता सगळेच याबाबत बोलत आहेत”, असंही ते म्हणाले.

“मी आता माझ्या मुलाला तिथे पाठवू शकत नाही. या व्हिडीओमुळे मी आणि माझी पत्नी पुरते घाबरलो आहोत. त्यामुळे आम्ही आता त्याला दुसऱ्या शाळेत टाकणार आहोत”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिक्षिकेने काय म्हटलं?

“संबंधित विद्यार्थ्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होती. त्या मुलाच्या काकानेच मला असं करण्यास सांगितलं होतं. मी ‘अपंग’ असल्याने मी इतर विद्यार्थ्यांना मारण्यास सांगितलं”, असं स्पष्टीकरण आरोपी शिक्षिकेनं दिलं आहे.