हिंदू देवतांचे फोटो असलेल्या कागदी प्लेटमध्ये चिकन विकल्याचा धक्कादायक प्रकर उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चिकन विक्रेत्याला अटक केली आहे. तालीब हुसेन असं या चिकन विक्रेत्याचे नाव आहे. अनेकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

तालीब हुसेन याचे संभळमध्ये छोटे हॉटेल आहे. तेथे चिकन विकण्यासाठी तो कागदी प्लेटचा वापर करायचा. मात्र, त्या प्लेटवर अनेक हिंदू देवी-देवतांचे फोटो होते. ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी ताबील विरोधात संभळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी होती, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलीस दुकानात पोहोचले असता तालीब हुसेन याने हत्येच्या हेतूने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Story img Loader