संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. विरोधी पक्षातील या खासदारांनी संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी त्यांना अधिवेशन संपेपर्यंत सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत म्हणाले, खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी आम्ही लढणार आहोत. या देशातील हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत. लोकशाहीची हत्या सुरू आहे त्याविरोधात लढणार आहोत. गुडघे टेकायला आम्ही मिंधे नाही. लोकशाहीचं मंदिर मोडून टाकायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं. लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिराचं उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही.

Sanjay Kelkar and Sanjay Bhoir of Mahayuti reunion in Thane city
संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन; ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

हेही वाचा >> पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना विरोध म्हणून खरगेंचं नाव पुढे? संजय राऊत म्हणाले, “सत्तेवर येण्याची…”

“राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर संसदेची प्रतिष्ठा राहिली पाहिजे. दिल्लीतील सर्वोच्च संसदेतील मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन तुम्ही नौटंकी करणार असाल तर राम तुम्हाला पावणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

मंगळवारी ४९ खासदारांचं निलंबन

‘इंडिया’ आघाडीतील खासदारांच्या निलंबनाचे सत्र मंगळवारीही सुरू राहिले. कथितरीत्या आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका ठेवत लोकसभेतील आणखी ४९ खासदारांवर कारवाई करण्यात आली असून गेल्या पाच दिवसांमध्ये दोन्ही सभागृहांतील एकूण १४१ खासदारांचे अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजपप्रणीत सरकारने नव्या संसद भवनात खासदार निलंबनाचा वेगळाच इतिहास रचल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. संसदेतील सुरक्षाभंगाच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सभागृहांमध्ये येऊन निवेदन देण्याच्या मागणीसाठी ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी दोन्ही सभागृहांत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी १३ व सोमवारी ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले होते.

इंडिया आघाडीच्या बैठकीत काय ठरलं?

संजय राऊत म्हणाले, इंडिया आघाडीची पाटणा, मुंबई आणि बंगलोर येथे बैठक झाली. दिल्लीत काल जी बैठक झाली तिथे समन्वयक, पंतप्रधान या विषयावर खुलेपणाने चर्चा झाली. बहुसंख्य पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. काल उद्धव ठाकरे दिल्लीत होते. त्यांनी महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या.. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह बैठक घेतली. इंडिया आघाडीच्या बैठकीआधीही उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चर्चा केली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव आला. काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्या पक्षात चर्चा होईल, मग निर्णय होईल.