पीटीआय, नवी दिल्ली : मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांच्या संबंधात गेल्या तीन महिन्यांत आपण तीन वेळा अधिकाऱ्यांना माहिती दिली होती, मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी शुक्रवारी सांगितले.  गेल्या तीन महिन्यांत महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी, बलात्कार आणि घरांची जाळपोळ यांसह महिलांविरुद्धचे गुन्हे आणि हिंसाचार यांच्याशी संबंधित होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वांशिक हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये ४ मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याच्या घटनेबाबत महिला आयोगाला १२ जून रोजी तक्रार मिळाली होती, मात्र आयोगाने त्यावर कार्यवाही केली नाही असा दावा करणारे वृत्त काही माध्यमांत प्रकाशित झाले होते, ते शर्मा यांनी नाकारले. ४ मे च्या घटनेची चित्रफीत १९ जुलैला ऑनलाइन फिरल्यानंतर शुक्रवारी आपण या घटनेची स्वत:हून दखल घेतली आणि या मुद्दय़ावर अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले, असे शर्मा म्हणाल्या.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
minister chandrakant patil opinion on next cm in the loksatta loksamvad program
मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

महिलांच्या प्रश्नांबाबत आपल्याला इतरही तक्रारी मिळाल्या होत्या आणि त्यासाठी आपण तीन वेळा मणिपूरमधील अधिकाऱ्यांना कळवले होते, मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, असे शर्मा यांनी सांगितले. ‘आम्हाला या पत्रांची सत्यता पडताळून पाहायची होती. त्याचप्रमाणे काही तक्रारी मणिपूरमधून नव्हत्या, काही तर भारतातूनही नव्हत्या. अधिकाऱ्यांकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, पण नंतर काल ही चित्रफीत व्हायरल झाल्यानतंर आम्ही स्वत:हून दखल घेतली’, असे शर्मा यांनी सांगितले.