आजकाल फेसबुक आणि त्यावर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट अनेकांसाठी जीव की प्राण झाल्या आहेत. एखादा घरगुती कार्यक्रम असो, सेल्फी असो की एखादी सहल असो, फेसबुकवर पोस्ट करण्यासाठी काही मंडळींना कारणच पुरेसे असते. काहींना तर काहीही कारण नसले तरी चालते. मात्र आता असे फोटोज फेसबुकवर टाकताना काळजी घ्या. कारण आता तुमच्या फेसबूक अकाउंटवर इन्कम टॅक्स अधिका-यांची नजर असू शकते.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार वाढत्या मंदीमुळे किंवा अन्य कारणांमुळे करदाते कर भरताना आपले उत्पन्न लपवतात किंवा कमी दाखवतात. पण हेच करदाते आपल्या सहलींचे व पार्टीचे फोटोज फेसबुकवर टाकतात आणि शेअर करतात. मात्र या शेअरिंगमुळे इन्कम टॅक्स करदात्यांचे खरे उत्पन्न अधिकाऱ्यांच्या नजरेस पडते. याच परदेशी सहलींच्या फोटोंचा करसंदर्भात चौकशीमध्ये इन्कम टॅक्सकडून वापर होत आहे.
दरम्यान,मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरात राहणारे करदाते ह्याला बळी पडत नाहीत. मात्र निमशहरी भागातील करदात्यांच्या या हालचालींवर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून बारीक लक्ष ठेवले जाते. असेच पश्चिम बंगालमधील असनसोल येथे एका चार्टड अकाउंटटला त्याच्या परदेशीय सहलीवरून हा अनुभव आला. लोकांच्या खाजगी गोष्टींमध्ये मध्यस्ती करू नये पण फेसबूक पोस्टवरून याच करदात्यांचे खरे उत्पन्न उघडकीस आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा